सुन मेरे बंधु रे | Sun Mere Bandhu Re

भाषा : मराठी
लेखक : सत्या सरन ( Satya Saran )
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर ( Milind Champanerkar )
पृष्ठे : ३१२
वजन : ४०० ग्रॅम

हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील अग्रणी संगीतकार सचिन देव बर्मन यांना चित्रपटमाध्यमाची चांगली जाण होती;
गानदृश्य व्हिज्युअलाइज करण्याची आणि प्रसंगानुरूप गाणी स्वरबद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात होती.
त्यांच्या अशा वैशिष्ट्यांमुळेच ते इतर समकालीन संगीतकारांपेक्षा खचितच अधिक चतुरस्र व सदाबहार संगीतकार ठरू शकले.
अशा त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांचा शोधक नजरेने मागोवा घेणा‌र्‍या सत्या सरन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी
केलेला हा अनुवाद– `सुन मेरे बंधु रे’.
`ये रात ये चाँदनी तू कहाँ’, `जलते है जिसके लिए’, `गाता रहे मेरा दिल’ ते `कोरा कागज था ये मन मेरा’ यांसारखी
असंख्य आनंददायी प्रणयगीतं… `वक्त ने किया क्या हंसी सितम’, `जाये तो जाये कहाँ’ यांसारखी अविस्मरणीय विरहगीतं…
`ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ सारखी सामाजिक रोष व्यक्त करणारी गीतं ते `वहाँ कौन है तेरा’, `सुन मेरे बंधु रे’ सारखी
त्यांनी स्वत: गायलेली या मातीतली व तत्त्वज्ञानात्म डूब असलेली गाणी…

300.00 264.00

Quantity