कुक्कुटपालन व्यवसाय मार्गदर्शक | Kukkutpalan Vyavsay Margadarshak

भाषा : मराठी
लेखक : वसंत हिंगणे (Vasant Hingne)
पृष्ठे : २५५
वजन :  ग्रॅम

पावसाची अनियमितता तसेच इतरही अनेक कारणांमुळे शेतकर्‍यांना शेतीपूरक उद्योगांवर विसंबून राहावे लागते. दुग्धोत्पादन, शेळीपालन यांसारख्या पूरक व्यवसायांबरोबरच कुक्कुटपालन हा व्यवसायही शेतकर्‍यांसाठी तसेच इतर व्यावसायिकांसाठीही फायदेशीर ठरत आहे. मात्र, आधुनिक पद्धतीने कुक्कुटपालन केल्यास त्यातून कमी श्रमात आणि खर्चात अधिक लाभ मिळवता येतो. त्यासाठी शास्त्रशुद्ध कुक्कुटपालन व्यवसायाचे तंत्र माहिती करून घेण्याची गरज आहे.

गेली अनेक वर्षे कुक्कुटपालन क्षेत्रात नवनवीन व्यावसायिक संस्था व व्यावसायिकही उतरल्यामुळे या क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. अशावेळी व्यवसायात नव्याने उतरू पाहणार्‍या व्यावसायिकांनी नेमका कोणत्या गोष्टींचा विचार करावा, तसेच आधीपासून या व्यवसायात असलेल्या कुक्कुटपालन व्यावसायिकांनी आपला व्यवसाय कसा वाढवावा व अधिक नफा मिळवण्यासाठी नेमके काय करावे, याबाबत या पुस्तकात तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले आहे.

375.00