अभंग तुकयाचे | Abhang Tukayache

भाषा : मराठी
लेखक : प्रा. डॉ. दत्तात्रय वासुदेव पटवर्धन ( Prof. Dr. Dattatray Vasudev Patvardhan )      
पृष्ठे :  ४७५
वजन :  १३१० ग्रॅम

संत तुकारामांच्या अलौकिक जीवनावर आणि त्यांच्या प्रतिभाशाली अभंगसृष्टीवर विपुल साहित्य
उपलब्ध आहे. त्या साहित्यामध्ये आपल्या अंगभूत वैशिष्टयांमुळे विशेष उठून दिसेल, असा हा प्रबंध आहे… तुकारामांच्या अभंगांमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचे जे प्रतिबिंब पडले आहे, त्यावरून त्यांच्या जन्म-निर्याण शकांची निश्चिती करणारा हा प्रबंध त्यांच्या समर्थ रामदासांशी व शिवाजी महाराजांशी झालेल्या भेटींबाबतही साधकबाधक चर्चा करतो. तुकारामांचा आध्यात्मिक जीवनविकास कसा होत गेला, त्यांना कोणकोणते पारमार्थिक अनुभव आले, त्यांना ‘भक्तिपंथ बहु सोपा’ का वाटला, याचा तौलनिक अभ्यास
या ग्रंथात आढळतो. त्यांच्या ऐहिक आणि पारमार्थिक शिकवणीचे मुद्देसूद विवेचन जसे आपल्यासमोर
येते, तसाच त्यांच्या अभंगांचा साहित्यशास्त्रीय आस्वादही घेतला जातो. बाबांच्या शिकवणुकीवर, तत्त्वज्ञानावर आणि कवित्वावर देशीविदेशी टीकाकारांनी घेतलेल्या वेगवेगळया आक्षेपांची यथोचित दखल घेत पुढे जाणारा हा ग्रंथ अखेरीस त्यांच्या अवतारसमाप्तीच्या पद्धतीवर विशेष प्रकाशझोत टाकतो.

600.00 570.00