स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर
१९७२ साली प्रथम प्रकाशित. वीरश्रेष्ठ सावरकरांच्या जीवनकार्याचे, वाङ्मयाचे, त्यांनी चालविलेल्या राजकीय नि सामाजिक, क्रांतिकारक नि भाषाविषयक विविध चळवळींचे हे साकल्याने घडविलेले एकसंध असे दर्शन आहे. त्यांच्या स्फोटक नि रोमांचकारी, ज्वलंत नि महाकाव्यसदृश्य चरित्राचे वास्तव व सत्यदर्शन घडविण्याचा हा एक प्रयत्न आहे. राष्ट्रभक्ती म्हणजे काय, परदास्याच्या शृंखला तोडीत असता देशभक्तांना काय काय हालअपेष्टा भोगाव्या लागतात आणि कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते ह्याची सम्यक कल्पना वीरश्रेष्ठ सावरकर ह्यांच्या चरित्रातून येते.
चौथी आवृत्ती – २ रे पुनर्मुद्रन । पाने : ७६८ । किंमत : ८७५/-

875.00 825.00

Quantity