डोंगरासाठी काही फुले | Dongarasathi Kahi Phule

भाषा : मराठी
लेखक : उत्तम कांबळे (Uttam Kamble)
पृष्ठे : १६८
वजन : १६७ ग्रॅम
डोंगराएवढी माणसं डोंगराएवढं काम करतात आणि आपापल्या क्षेत्रात कोरून जातात कधीही न पुसता येणार्‍या पाऊलखुणा.
ही माणसं मृत्यूनंतरही आपल्यातच असतात त्यांच्या विचारांच्या रूपात,कर्तबगारीच्या रूपात आणि विविध वाटांच्या रूपात.
अनेक डोंगरांनी इतरांबरोबर मलाही सावली दिली,आपल्या अंगाखांद्यावर उदंड खेळण्याची संधी दिली.
ही डोंगराएवढी माणसं जेव्हा शेवटच्या प्रवासाला निघाली तेव्हा सार्‍या समाजालाच हुंदका फुटला.
डोळ्यांतून मार्ग काढत अश्रू बाहेर पडले,डोंगराकडे निघाले.
हे सारे डोंगर मावत नाहीत कोणत्या भूमितीत आणि भूगोलातही…
अशा डोंगरासाठी फुले वाहण्याचा हा प्रयत्न.
डोंगर बनलेल्या माणसांच्या कर्तृत्वाचा सुगंध सर्वांपर्यंत नेण्यासाठी…

180.00

Quantity