भाषा : मराठी
लेखक : अरुण टिकेकर ( Arun Tikekar )
पृष्ठे : १७६
वजन : १०० ग्रॅम
ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यांचा वारसा लाभलेल्या तिसर्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे अरुण टिकेकर प्राध्यापक, वाङ्मयतज्ज्ञ, संदर्भ-विभाग प्रमुख, संशोधन-विभाग प्रमुख, साहाय्यक संपादक अशा पदांवर अनुभव घेत सप्टेंबर १९९१ मध्ये दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. दशकाहून अधिक वर्षं त्या पदांवर ते कार्यरत राहिले. इंग्रजी वाङ्मयशाखेचे विद्यार्थी असलेल्या टिकेकरांनी बहुशाखीय अभ्यासाचा तसंच संशोधनाचा पाठपुरावा केला. वाङ्मयेतिहासाबरोबर स्थानीय इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या इतिहासलेखनाच्या नवप्रवाहांत रुची निर्माण झाल्यानं त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनास उपयुक्त ठरतील अशा इंग्रजी आणि मराठी अशा ग्रंथांचा शोध घेतला. त्यातून झालेल्या वाचन-बोधातून त्यांचे ग्रंथ-जीवन साकारले.
भाषा : मराठी
लेखक : अरुण टिकेकर ( Arun Tikekar )
पृष्ठे : १५६
वजन : १८० ग्रॅम
गेल्या पन्नास-साठ वर्षांत आपल्या समाजात झालेल्या पडझडीचे चित्रण करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.स्वातंत्र्याच्या कालखंडात महाराष्ट्राने काय गमावले, काय कमावले याचा आलेख काढणारा.त्यात कमावण्याच्या बाजूला थोडेच आणि गमावण्याच्या बाजुला भरपूर असल्याचेच आढळून आले.समाजबदल तर होत होता.तो केवळ बाह्यस्वरूपी होत आहे,का केवळ तंत्रंयानाने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत,की समाजमन वैंज्ञानिक विचारांची कास धरून विवेकवादी होत आहे,धर्माचे अवडंबर कमी होत आहे की वाढत आहे,असे प्रश्नही मनात येऊ लागले…