डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१९६६ साली प्रथम प्रकाशित चरित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असताना लिहिलेले व स्वत: बाबासाहेबांनी वाचलेले हे एकमेव चरित्र आहे. या चरित्रग्रंथातील सर्व तपशील हा बाबासाहेबांच्या नजरेखालून गेला होता. इतिहास, कला, सत्यनिष्ठा, अभिरुची, कालक्रम व समतोलपणा यांचे भान राखून अत्यंत समरसतेने लिहिलेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीवर, व्यक्तिमत्त्वावर, मानसावर व कार्यावर प्रकाश टाकणारा हा चरित्रग्रंथ अप्रतिम असून दलित व बहिष्कृत भारताचे सम्यक दर्शन घडवतो.
८ वे पुनर्मुद्रन । पाने : ६६५ । किंमत : ९००/-
महात्मा जोतीराव फुले
१९६८ साली प्रथम प्रकाशित या चरित्रात महात्मा फुले यांच्या जीवनाचे समग्र, विस्तृत नि यथातथ्य दर्शन घडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुले यांचे चरित्र लिहिण्याचा मानस धनंजय कीर यांनी पूर्ण केला. महाराष्ट्र सरकारने १९६८ साली या ग्रंथास पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील समाज क्रांतीचे दर्शन घडवणारा हा अमोलीक ग्रंथ अत्यंत वाचनीय, उद्बोधक नी स्फूर्तीदायक आहे. या महापुरुषाचे समग्र चरित्र महाराष्ट्रातील विचारवंतांना, समाजसेवकांना नि राष्ट्रीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल.
११ वे पुनर्मुद्रन । पाने : ३६६ । किंमत : ४७५/-
राजर्षी शाहू छत्रपती
राजर्षी शाहू छत्रपती नामक मानवतेच्या प्रेषिताची, कर्माने राजपद भोगणाऱ्या पण सेवेने मन, बुद्धी, अंतःकरणाने क्रांतदर्शी असणाऱ्या राजसिंहाची, लोकशाहीच्या पुरस्कर्त्या, कर्त्या लोकसेवकाची, पण व्यक्तिस्वातंत्र्याचे आचरण करणाऱ्या अद्वितीय मानवाची साक्षेपी कथा मा. धनंजय कीर यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने, व्यासंगी चिकित्सक व संशोधनपर अभ्यासाने, समतोल दृष्टीने लिहिली आहे.
६ वे पुनर्मुद्रन । पाने : ६४८ । किंमत : ८५०/-