भाषा : मराठी
लेखक : डॉ. सी. पी. श्रीवास्तव ( Dr. S. P. Shrivastav )
अनुवाद : डॉ. वसंत पटवर्धन ( Dr. Vasant Patvardhan )
पृष्ठे : २५५
वजन : २७५ ग्रॅम
हरितक्रांती साध्य झाली. आधुनिक युगातील महत्त्वाच्या क्षेत्रांतही लक्षणीय प्रगती झाली, तरी भारतातील कोट्यवधी जनतेच्या प्राथमिक गरजाही आज का पूर्ण होऊ शकत नाहीत? सी.पी. श्रीवास्तव यांच्या मते याला मुख्य कारण देशातील सर्वव्यापी भ्रष्टाचार ! श्रीवास्तव हे ज्येष्ठ जाणकार आणि संवेदनशील माजी सनदी अधिकारी. स्वच्छ कारभारासाठी दबदबा असलेल्या श्रीवास्तव यांची लालबहादुर शास्त्री यांनी पंतप्रधानपद स्वीकारताच मुख्य सचिव म्हणून नेमणूक केली होती. या पुस्तकात भ्रष्टाचाराच्या विविध पैलूंचा मागोवा घेत त्याच्या मूळ कारणांशी जाण्याचा प्रयत्न आहे. तसेच संभाव्य भयावह परिणामांची चर्चा आहे. मुख्य म्हणजे या उच्चपदस्थ माजी सनदी अधिकार्याने भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी अभ्यासपूर्ण व्यापक उपाययोजनाच सुचवली आहे. देशाचे संरक्षण बाह्यशत्रूपासून जितके महत्त्वाचे तितकेच या अंतस्थ शत्रूचा मुकाबला करणेही महत्त्वाचे होय !