भाषा : मराठी
खंड : २
लेखक : गो. स. सरदेसाई
वजन : १.५ किलो
ह्या रियासतीत पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को-द-गामा पासून ते १८१८ मध्ये मराठ्यांच्या सत्तेचा अस्त झाला आणि त्यानंतर १८५७ चे बंड निष्प्रभ करत संपूर्ण देशावर ब्रिटिशांनी आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला, तिथपर्यंतचा इतिहास वाचायला मिळतो.
भाषा : मराठी
खंड : ८
लेखक : गो. स. सरदेसाई
वजन : ५ किलो
इ. स. १६०० पासून म्हणजे शहाजी राजे यांच्या जन्मापासून इ. स. १८१८ पर्यंत सुमारे अडीचशे वर्षांच्या कालखंडातील महत्वाच्या घटना आणि व्यक्ती यांचा कालक्रमाने लिहिलेला मराठी भाषेतील हा एकमेव इतिहास आहे. मराठी सत्तेचा उदय, उत्कर्ष, उतरती अवस्था आणि अस्त या सर्व अवस्थांचे अतिशय मार्मिक, साधार आणि समतोल विवेचन ‘मराठी रियासती’तच शोधावे लागते.
भाषा : मराठी
खंड : २
लेखक : गो. स. सरदेसाई
वजन : १.५ किलो
ह्या रियासतीत महंमद गझनीच्या भारतावरील पहिल्या स्वारीपासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा म्हणजे इ. स. १००० ते इ. स. १७०७ असा सातशे वर्षांचा इतिहास वाचायला मिळतो. भारतातील मुसलमानी राजवटीचा असा सलग आणि तपशीलवार इतिहास मराठीत तरी हा एकमेव असावा.
भाषा : मराठी
खंड : १२
लेखक : गो. स. सरदेसाई
वजन : ८ किलो
गोविंद सखाराम सरदेसाई यांनी ’हिंदुस्थानचा अर्वाचिन इतिहास’ या मालेत मराठी रियासत, ब्रिटिश रियासत आणि मुसलमानी रियासत असे एकुण १२ खंडात हिंदुस्तानचा सुमारे साडेआठशे (इ. स. १००० ते इ. स. १८५८) वर्षांचा इतिहास लिहिला आहे.