भाषा : मराठी
लेखक : शहनाज बशीर ( Shahanaj Bashir )
अनुवाद : गीतांजली वैशंपायन ( Geetanjali Vaishapayan )
पृष्ठे : १६८
वजन : ग्रॅम
‘ती काळोखी रात्र थकली आहे. दूरवर आभाळात उगवलेला तो चंद्रही खूप थकला आहे.’
साल सुमारे 1990. काश्मीर नुकतंच धगधगू लागलं होतं. ज्यांना सुरुवातीला याची झळ पोहोचली, ते गुलाम रसूल जू हे हलीमाचे वडील. पहिल्या दुर्दैवी लोकांपैकी एक. त्यांचा बळी जातो आणि तिचा दहावीची परीक्षा दिलेला मुलगा इमरान याला चौकशीसाठी पकडून नेलं जातं. पुढे त्याचा काहीही ठावठिकाणा लागत नाही.