भाषा : मराठी
लेखक : डॉ. हरि कृष्ण बाखरू ( Dr. Hari Krushna Bakharoo )
पृष्ठे : १६८
वजन : १६० ग्रॅम
आरोग्यवर्धक जीवनसत्त्वे रोगनिवारणासही मदत करतात. खनिजे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात. अमायनो अॅसिडस् शरीराला आश्चर्यकारक शक्ती पुरवतात. या सर्व अत्यावश्यक घटकांचे शरीरातील कार्य कोणते, हे घटक कशापासून मिळू शकतात, शरीरात त्यांच्या अभावाची लक्षणे कोणती, त्यातील औषधी गुणधर्म कोणते, कोणता घटक कोणत्या दुखण्यावर पूरक उपाय ठरू शकतो, तो कशाप्रकारे शरीराला प्राप्त करुन द्यावा… ही सर्व व इतर शास्त्रीय माहिती या पुस्तकात पध्दतशीरपणे दिली आहे.
भाषा : मराठी
लेखक : हरि कृष्ण बाखरू ( Hari Krushna Bakharoo )
अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )
पृष्ठे : १४०
वजन : १५० ग्रॅम
मधुमेह झाला की रोगी अॅलोपॅथी औषधांकडे धाव घेतात. ती महाग तर असतातच कारण ही औषधं हा झाला वरवरचा उपाय. मधुमेहाला आळा बसवणारे अनेक नैसर्गिक उपाय आहेत हे किती जणांना ठाऊक असतं? या उपायांनी मधुमेहाचे दुष्परिणाम कमी करुन चांगले आरोग्य आणि कार्यक्षम जीवन निश्चितच साध्य करता येतं.
भाषा : मराठी
लेखक : हरि कृष्ण बाखरू ( Hari Krushna Bakharoo )
अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )
पृष्ठे : १०८
वजन : १२० ग्रॅम
निसर्गात सौंदर्य सामावलेलं आहे त्याचप्रमाणे मानवी शरीराचे सौंदर्य वाढवण्याचे गमकही त्यात लपलेलं आहे. निसर्गोपचारतज्ज्ञांनी विविध अन्नपदार्थांचा व वनौषधींचा नेमका वापर, घरगुती सोप्या उपायपध्दती यांचा अभ्यास करून त्याद्वारे शरीरसौंदर्यात अंतर्बाह्य आणि कायमस्वरूपी भर कशी पडू शकते, याची उकल केली आहे.
भाषा : मराठी
लेखक : हरि कृष्ण बाखरू ( Hari krushana Bakharoo )
अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )
पृष्ठे : १९२
वजन : २०० ग्रॅम
अनेक वनस्पतींमध्ये (Herbs) विविध औषधी गुणधर्म असतात, शरीराची झीज भरून काढण्याची क्षमता असते. तसेच बर्याचशा आधुनिक औषधांचा मूलस्रोत वनस्पतींमध्ये असतो, हे सर्वचजण जाणतात. परंतु त्याची शास्त्रशुध्द मांडणी करणे व जनसामान्यांना नेमकी माहिती देणे, हे कार्य निष्णात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू सातत्याने करीत आहेत. अनेक व्याधींवर वनौषधी गुणकारी कशा ठरू शकतात याबद्दलची माहिती बाखरू यांनी या पुस्तकात दिली आहे