भाषा : मराठी
लेखक : कांचन काशिनाथ घाणेकर ( Kanchan Kashinath Ghanekar )
पृष्ठे : ४४०
वजन : ग्रॅम
डॉक्टरांचे निळे टपोरे डोळे आरपार वेध घ्यायचे. त्यांचे एखाद्या लहान मुलासारखे खळाळून हसणे पाहत राहावेसे वाटे. त्यांचा भावदर्शी चेहरा मोहित करायचा. अंहं. पण ज्याच्यासाठी मी वेडावून जावे, असे त्यांच्याजवळ विशेष असे काय होते? घरीदारी, कॉलेजमध्ये त्यांच्याहूनही देखणी मंडळी मी पाहत होते. शिवाय ते सर्व माझ्या बरोबरीच्या वयाचे होते. अविवाहित होते. मग डॉक्टरांचेच इतके आकर्षण मला का वाटत होते? –आणि मग एकच उत्तर डोळ्यांसमोर येत होते – ‘डॉक्टरांचे कलंदर व्यक्तिमत्त्व’, ‘सो व्हॉट?’ असं बेदरकारपणे विचारणारा त्यांचा बेधडक स्वभाव. त्यांच्या रांगडेपणाने, धसमुसळ्या स्वभावाने मला मंत्रमुग्ध केले होते. माझ्या उपजत आवडींना डॉक्टरांची ही सगळी स्वभाववैशिष्ट्ये आकर्षून घेत होती, हे नक्कीच होते.