मनोज हाडवळे

२०११ मध्ये ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राची स्थापना करुन व्यवस्थापकीय संचालक म्हणुन कामास सुरवात
पर्यटन केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील
जुन्नरला विशेष पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यामध्ये मोलाची भुमिका
विविध कृषीविषयक मासिके, दिवाळी अंक, वर्तमानपत्रे, इत्यादींसाठी दर्जेदार कृषीपर्यटन विषयक लेखन. ऍग्रोवन दैनिकात सदर लेखन
सोशल मीडियावर जबाबदार पर्यटनाविषयी संवेदनशील लेखन
कृषी पर्यटन पुरस्कार, ग्रामोन्नती कृषी उद्योजक पुरस्कार यांसह अनेक पुरस्कारांचे मानकरी
कृषी पर्यटन शाळांमध्ये प्रशिक्षक म्हणुन कार्यरत

भाषा : मराठी लेखक : मनोज हाडवळे (Manoj Hadwale) पृष्ठे : ११२ वजन : २३० ग्रॅम मागील सात वर्षं ग्रामीण व संस्कृती पर्यटनात काम करत असताना तसेच पर्यटन सल्लागार म्हणुन अनेक लोकांना भेटत असताना काही प्रश्न वारंवार विचारले गेले. त्यात काही प्रश्न कृषी पर्यटन उभारणार्‍यांनी विचारले, काही येथे फिरायला येणार्‍या पाहुण्यांनी विचारले, तर काही ग्रामीण व संस्कृती पर्यटनाच्या अभ्यासाला येणार्‍या देशविदेशातील विद्यार्थ्यांनी विचारले. मनोज हाडवळेंच्या अनुभवातून, निरिक्षणांतून व त्यातील आकलनातून जे काही मुद्दे समोर आले, ते त्यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लेखकानी हे पुस्तक लिहिण्याचा घाट घातला. हे पुस्तक कृषी ग्रामीण व संस्कृती पर्यटन समजून घेणार्‍या सर्वांसाठी उपयोगी ठरेल.
160.00
Add to cart

Showing the single result