भाषा : मराठी
लेखक : प्रा. डॉ. पुष्कर रमेश शास्त्री ( Prof. Dr. Pushkar Ramesh Shastri )
पृष्ठे : २१२
मराठ्यांच्या अमलाखालील गुजरात
प्रशासकीय, सामाजिक व आर्थिक अभ्यास (१७०७-१८१८)
‘मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने अटकेपार झेंडे लावले’ एवढ्यावरच आम्ही मराठी राज्य विस्तार संपवितो. पण गुजरात, माळवा, बुंदेलखंड, कर्नाटक या प्रदेशात मराठ्यांनी राज्य निर्माण केले व ते शतकाहून अधिक काळ टिकले. हा राज्य विस्तार करणारे मराठी घराणे आजही त्या-त्या भागात असून जनतेत त्यांच्याविषयी आदरच आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करून आदर्श राज्याचा परिपाठच घालून दिला होता. धर्म सहिष्णूवृत्ती, शेतकरी व स्त्रीयांना संपूर्ण संरक्षण, आदर्श महसूल व्यवस्था, समानता हे त्याची खास वैशिष्ट्ये. पुढील काळात मराठ्यांनी जिथे जिथे राज्यविस्तार केला तिथेतिथे हाच कित्ता गिरविला. ‘रयत आबाद राखणे’ हेच मराठ्यांचे धोरण राहिले म्हणूनच मराठी राज्य अनेक प्रदेशात दिर्घकाळ टिकले. याचे श्रेय मराठ्यांच्या प्रशासनाला व त्यांच्या धर्म सहिष्णूवृत्तीला द्यावेच लागेल. प्रा. डॉ. पुष्कर रमेश शास्त्री यांनी या सर्व गोष्टींचा चिकित्सक व वस्तूनिष्ठ अभ्यास अप्रकाशित अस्सल मोडी साधनांच्या आधारे त्यांच्या ‘मराठ्यांचा अमलाखालील गुजरात’ ह्या ग्रंथात केला आहे. त्यामुळे हा ग्रंथ संशोधकांबरोबरच रसिक वाचकांनाही वाचनीय आहे.