भाषा : मराठी
लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re )
अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )
पृष्ठे : १२०
वजन : १५० ग्रॅम
प्रख्यात गुप्तहेर फेलूदा आणि त्याचा किशोरवयीन साहाय्यक तोपशे यांच्या ‘बादशहाची अंगठी’ या कादंबरीत साहस, रहस्य आणि गुंतागुंत यांचे वाचकांना खिळवून टाकणारे उत्कंठावर्धक मिश्रण आहे. फेलूदा व तोपशे लखनऊमध्ये सुटी घालवत असताना एक मोगलकालीन अमूल्य अंगठी चोरीस जाते. फेलूदा तपासाला सुरुवात करतो आणि प्रारंभ होतो एका दुष्ट गुन्हेगाराच्या पाठलागाला. हा पाठलाग त्याला थेट लक्ष्मणझुल्यापर्यंत घेऊन जातो. तेथे एका खडखड्या सापाशी त्याला सामना करावा लागतो.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे पहिले पुस्तक.