भाषा : मराठी
लेखक : शशी देशपांडे ( Shashi Deshapande )
अनुवाद : सरोज देशपांडे ( Saroj Deshapande )
पृष्ठे : २०२
वजन : ग्रॅम
भरल्या संसारातून अचानक उठून गोपाळ निघून जातो. सुमीला त्याचं कारण कळत नाही. गोपाळच्या निघून जाण्याचा ती फक्त निष्प्रश्न स्वीकार करते. विनाअट त्याला बंधनातून मुक्त करते. तिघी मुलींना घेऊन माहेरी जाते.
माहेरच्या घरात, ‘मोठया घरा’त नि:शब्दतेची भिंत आहे. गेली पस्तीस वर्षं पतिपत्नीचं संभाषण नाही. त्यामागे वेदनेनं ठसठसलेला एक भूतकाळ आहे. आईवडिलांच्या जीवनातल्या काळोखाच्या पार्श्वभूमीवर सुमीचं अंधारून आलेलं आयुष्य आणखीच गडद भासतं. सुमी त्यातून अपघातानेच सुटून जाते. तिच्या मुलींच्या आयुष्याचा ताण वाचकाच्या मनावर रेंगाळत राहतो.
कल्याणी आणि सुमीचं दु:ख, वेदना क्वचितच प्रकट होतात. मनातल्या वेदनेच्या डोहावर उठतात फक्त काही तरंग. ती अबोल वेदना वाचकाच्या काळजात कळ उठवते.
कर्नाटकातल्या एका कुटुंबाच्या कथेतून कुटुंबातल्या नातेसंबंधांचं, अबोल ताण आणि अतूट स्नेहबंध यांचं चित्रण शशी देशपांडे यांनी केलेलं आहे. वडिलांचा संन्यास, आजोबांची परकी, तटस्थ विरक्ती यांचा अन्वयार्थ शोधणारी त्यांची नायिका अरू वाचकाला गुंतवून ठेवते.