आरोग्य सल्ले | Aarogya Salle

भाषा : मराठी
लेखक :  डॉ. सोनिया कक्कर ( Dr. Sonia Kakkar )
अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )
पृष्ठे :  १६०
वजन :  १९० ग्रॅम

सुदृढ आरोग्य म्हणजे तंदुरुस्त शरीर व त्याला मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याची असलेली जोड. म्हणजेच जर शरीर तंदुरुस्त असेल आणि तुमचं मन-चित्त प्रसन्न असेल तरच तुम्ही आनंददायी जीवन जगू शकता. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे? डॉ. सोनिया कक्कर या पुस्तकाद्वारे अगदी सहज सोप्या भाषेत व थोडक्यात ‘आरोग्यदायी जीवनशैली’चे विविध कानमंत्र देतात. जड वैद्यकीय भाषेत नसलेले छोटे परंतु अत्यंत प्रभावी असे हे कानमंत्र आहेत.

Original price was: ₹125.00.Current price is: ₹110.00.

Quantity

Description

रोजच्या आयुष्यात डोकावणार्‍या साध्या-सुध्या प्रश्नांची तसेच गंभीर प्रश्नांचीही चर्चा त्यांनी यात केली आहे. उदाहरणार्थ मधुमेहाची लक्षणं कशी ओळखावीत, तणावमुक्त कसं राहावं, औषधाचा बॉक्स अद्ययावत् का ठेवावा इथपासून ते डुलकी घ्यावी की नाही आणि योग्य ब्रश कसा निवडावा इथपर्यंत विविध समस्यांचा ऊहापोह त्यांनी केला आहे.
आरोग्याशी निगडित विविध समस्यांची सोपी उत्तरं देणारं आणि जीवनाकडे बघण्याची एक नवीन व निकोप दृष्टी देणारं पुस्तक…छोटे प्रभावी आरोग्य सल्ले!