अदान ॲण्ड ईव्हा | Adan And Evha

भाषा : मराठी
लेखक :  अयान हिरसी अली/ ॲना ग्रे ( Ayan Hirsi Ali/ Ana Gre )
अनुवाद : उज्वला गोखले ( Ujvala Gokhale )
पृष्ठे :  ७२
वजन :  ग्रॅम

80.00

Quantity

Description

‘अदान अँड ईव्हा’ या पुस्तकाचा अनुवाद उज्ज्वला गोखले यांनी केला आहे. सोमाली येथे जन्मलेल्या अयान हिरसी अली जागतिक किर्तीच्या लेखिका आणि राजकीय नेत्या आहेत. वडिलांनी ठरवलेले लग्न मान्य नसल्याने त्यांनी घर सोडले आणि नेदरलँड येथे आश्रय घेतला. तेथेच त्यांी राज्यशास्त्रात पदवी मिळवली आणि नंतर तीन वर्षे डच संसदेत सदस्य म्हणून काम केले. या काळात त्यांना आलेले अनुभव, धर्माबद्दलची मते, त्यांच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेवर जहालवाद्यांनी त्यांच्यावर केलेली टीका या सगळ्याचे चित्रण ‘अदान अँड ईव्हा’ या पुस्तकातून केले आहे. या पुस्तकातून लहान मुलांची आयुष्य सोपी नसतात हे अधोरेखित करताना लहान वयापासूनच मुलांनी वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि याकडेच आपण दुर्लक्ष करतो हे महत्त्वाचे तत्त्व मांडले आहे. अयान हिरसी अली आणि अॅना ग्रे लिखित या गोष्टीत अदाज आणि इव्हा या किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाचे खूप सुंदर वर्णन केले गेले आहे. पूर्णपणे भिन्न धर्म, संस्कृती आणि सामजिक परिस्थिती असलेली दोन कोवळी मुले योगायोगाने एकत्र येतात आणि दोघांच्याही एकाकी जीवनात एक अनोखे मैत्र निर्माण होते. अयान अली यांनी ती कथा वास्तवतेच्या सरल पातळीवर नेली आहे. लहान मुलांचे भावविश्व आणि त्यात मानवनिर्मित धर्म, संस्कृतीच्या आणि सामाजिक आशयांच्या भाषांच्या भिंती याची थेट जाणीव करून दिली आहे. मुलांच्या नैसर्गिक वागण्यात मानवनिर्मित व्यवहारांचा लवलेश नसतो. मात्र, मुलांनाही सामाजिक परिस्थितीच्या चौकटीत नाईलाजाने राहावे लागते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. लेखिका बंडखोर आहेत. त्यांची नाळ समाजाशी जुळलेली आहे. या घटनांचा दोन्ही समाजातील शहाण्यासुरत्या माणसांनी लावलेला अर्थ आणि त्यावरील त्यांची प्रतिक्रिया, यातून वर्तमानातील काही सत्य प्रसंगांची आठवण होते आणि परिस्थितीचा कसा विपर्यास होऊ शकतो याची प्रचिती येते. पुढे ठाकलेल्या प्रसंगाची कल्पना असूनही आपला आशावाद हरपू न देता ही दोन निरागस मुले जी स्वप्ने रंगवतात, त्यावर फक्त तथास्तु एवढेच म्हणावेसे वाटते.