अज्ञात विवेकानंद | Adnyat Vivekanand
भाषा : मराठी
लेखक : शंकर ( Shankar )
अनुवाद : डॉ. मृणालिनी गडकरी ( Dr. Mrunalini Gadkari )
पृष्ठे : १९८
वजन : २५५ ग्रॅम
₹225.00 ₹214.00
Description
स्वामी विवेकानंदांचे नाव आणि ढोबळमानाने त्यांचे चरित्र आपल्याला माहीत
असते; पण संन्यास घेतल्यानंतरही स्वामीजींनी संवेदनशीलता जपली होती,
जन्मदात्या आईसाठी कौटुंबिक भाऊबंदकीत लक्ष घालणे त्यांना भाग पडले
होते, अगदी कोर्टकचे-याही कराव्या लागल्या होत्या… हा असा तपशील मात्र
आपल्याला ठाऊक नसतो. त्यांच्या चरित्रातील अशा अज्ञात पैलूंवर प्रकाशझोत
टाकणारे हे पुस्तक.
स्वामीजींचे पाककौशल्य, त्यांच्या खानपानातल्या आवडीनिवडी, त्यांनी
परदेशांत वेदांताप्रमाणेच बिर्याणीचाही केलेला प्रसार, त्यांचे चहावरचे कमालीचे
प्रेम, त्यांना जडलेले त-हेत-हेचे आजार आणि त्यांच्या आरोग्यामध्ये सतत
होत राहिलेले चढउतार, पशुपक्ष्यांबद्दलचे त्यांचे प्रेम, आपला अंतकाळ जवळ
आल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी केलेली कौटुंबिक निरवानिरव, त्यांनी सतत
जवळ बाळगलेली गंगाजलाची कुपी… आणि सर्वांनाच चटका लावून गेलेले
त्यांचे महानिर्वाण…
हे आणि असे असंख्य अज्ञात पैलू उजेडात यावेत, या हेतूने ‘शंकर’ या
टोपणनावाने प्रसिध्द असणा-या बंगाली साहित्यिकांनी विवेकानंदविषयक
देशीविदेशी साहित्याचा धांडोळा घेऊन तयार केलेले हे पुस्तक बंगालमध्ये
विक्रमी लोकप्रियता कमावणारे ठरले. आता ते थेट बंगालीतून मराठीत
अवतरले आहे.
Additional information
Weight | 255 g |
---|---|
Pages | 198 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.