अंतोनी गौडी आणि सँटियागो कॅलट्राव्हा | Antoni Gaudi Aani Satiyago Kaltrava

भाषा : मराठी
लेखक : श्रीनिवास नी. माटे ( Shrinivas N. Mate )
पृष्ठे : १३६
वजन : ग्रॅम

Original price was: ₹250.00.Current price is: ₹238.00.

Quantity

Description

जलपरीच्या राज्यातच शोभावं, असं प्रवेशद्वार! चर्चमधील वास्तुरचनेतून फुललेलं वसंतवैभव! प्रकाशाची फुले उधळणारे रस्त्यावरचे कलात्मक दिवे अनेक रंगांतून नटणाऱ्या निसर्गाला वास्तुशिल्पात अंकित करणारा अंतोनी गौडी. पंख उभारलेला राजहंसच – असा आर्ट म्युझियमचा डौल! ऑपेरा हाऊस म्हणजे जणू सामुराई योद्धा! परग्रहावरलं यान वाटावं, असं सायन्स सेंटर! आधुनिकतेचा कलात्मक गोफ विणणारा कल्पक रचनाकार सँटियागो कॅलट्राव्हा. दोघात अंतर शतकाचं, पण दोघंही स्पेनमधले. दोघंही स्थापत्यातले महाकवी. वास्तू, अवकाश, निसर्ग, भवताल आणि मानवी जीवन यांच्या गुंफणीतून अजरामर कलाकृती साकारणा-या या प्रतिभावान वास्तुरचनाकारांचा सचित्र, मनोवेधक कार्यालेख – श्रीनिवास नी. माटे या विख्यात आणि रसिक वास्तुरचनाकाराच्या शैलीदार लेखणीतून… अंतोनी गौडी आणि सँटियागो कॅलट्राव्हा