मराठ्यांच्या इतिहासातील दुर्मिळ १२ बखरींचा संच १

Category:

Out of stock

3,400.00 3,300.00

Description

१. शिवभारत
शिवचरित्राचे समकालीन आणि अतिशय विश्वसनीय साधन. परमानंद ह्यांनी शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन शिवभारत रचले असुन त्याची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास आली आहे. ह्या पुस्तकांत संस्कृत आणि मराठी भाषांतर दोन्ही उपलब्ध आहे. । रु. ४००/-

२. मराठ्यांची बखर – ग्रांट डफ
ग्रांट डफ या इंग्रज अधिकाऱ्याने मराठ्यांच्या इतिहासातील पुरातन लेख, पत्रे, बखरी समजुन इंग्रजी भाषेत बखर छापली आणि त्यानंतर १८२९ साली ती मुंबईत मराठीत छापली. । रु. ४००/-

३. जेधे शकावली-करीना
जेधे घराण्याचा इतिहास सांगणारी साधने मूळ मोडी लिपीत तसेच मराठीत भाषांतरीत आहेत. इतिहासातील बहुतांशी प्रत्यंतर पुराव्याने सिद्ध झालेल्या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी या शकावलीत आल्या आहेत. सतराव्या शतकाच्या इतिहासाचे विश्वसनीय साधन म्हणजेच जेधे शकावली-करीना. । रु. ३९५/-

४. रामचंद्र आमात्यांचे आज्ञापत्र
रामचंद्रपंत आमात्यांचा ‘आज्ञापत्र’ ग्रंथ मराठ्यांच्या इतिहासाचे एक अव्वल साधन म्हणून मानला जातो. शिवकालीन राज्यकारभाराच्या तसेच मध्ययुगीन मराठी भाषेच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ मौलिक स्वरूपाचा आहे. । रु. ४००/-

५. परमानंदकाव्यम
परमानंदकाव्यम म्हणजेच अनुपुराण. शिवकालीन प्रख्यात शिवचरित्रकार परमानंद गोविंद नेवासकर यांच्या देवदत्त या पुत्राने व गोविंद या नातवाने शिवपुत्र शंभुछत्रपती यांच्यासंबंधी प्रस्तुत काव्य संस्कृत मध्ये लिहिले. ह्या पुस्तकांत संस्कृत आणि मराठी भाषांतर दोन्ही उपलब्ध आहे. । रु. २२५/-

६. शिवछत्रपतींचे चरित्र – सभासद बखर
कृष्णाजी अनंत सभासद यांनी राजाराम महाराजांच्या आज्ञेवरुन शिवछत्रपतींचे चरित्र अर्थात सभासद बखर १६९७ मध्ये लिहिली आहे. शिवचरित्रातील घटना हा याचा विषय असुन सुरुवातीस शिवाजी महाराजांच्या पुर्वजांची माहिती देऊन मग महाराजांचे चरित्र निवेदन केले आहे. । रु. २१०/-

७. श्री शिवछत्रपतींची 91 कलमी बखर
मंत्री दत्ताजी त्रिमळ वाकेनिविस ह्यांनी लिहिलेल्या ह्या बखरीचा कालखंड १७६० पासून १७९० असावा. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग विविध कलमांमध्ये ह्या बखरीत वर्णिले आहे. । रु. १५०/-

८. सप्तप्रकारणात्मक चरित्र (चिटणीस विरचित)
मल्हार रामराव चिटणीस यांनी दुसऱ्या शाहू छत्रपतींच्या आज्ञेने छत्रपती शिवाजीमहाराजांचे हे चरित्र लिहिले आहे. चिटणीसांनी विस्तारपुर्वक अस्सल आणि दुय्यम साधनांच्या आधारे ह्या चरित्राचे लेखन केले आहे. चिटणीस हे धाकट्या शाहू महाराजांचे लेखनाधिकारी – सरकारी कारकुन आणि खंडो बल्लाळ यांचे पणतू. । रु. ३००/-

९. श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले राजाराम महाराज यांचे चरित्र  (चिटणीस विरचित)
छ्त्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांची हि चरित्रे मल्हार रामराव चिटणीस यांनी दुसऱ्या शाहू छत्रपतींच्या आज्ञेने लिहिली आहे. चिटणीसांनी मागील कागदपत्रांचे दाखले आणि श्रुत असलेल्या माहितीवरुन चरित्र लिहिले आहे. । रु. २७०/-

१०. थोरले शाहू महाराज यांचे चरित्र (चिटणीस विरचित)
पुण्यश्लोक थोरले शाहूमहाराज यांचे हे चरित्र मल्हार रामराव चिटणीस यांनी दुसऱ्या शाहू छत्रपतींच्या आज्ञेवरुन लिहिले आहे. । रु. ३००/-

११. राधामाधवविलासचंपू
राधामाधवविलासचंपू म्हणजे शाहजी महाराजांचे चरित्रच म्हणावे लागेल. कर्नाटकात शाहजी महाराजांच्या दरबारात संस्कृतपंडित जयराम पिंडे ह्यांनी हा समकालीन ग्रंथ लिहिला. । रु. २५०/-

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठ्यांच्या इतिहासातील दुर्मिळ १२ बखरींचा संच १”