बाराला दहा कमी…! | Barala Daha Kami….!
भाषा : मराठी
लेखिका : पद्मजा फाटक ( Padmja Fatak )
पृष्ठे : ३७०
वजन : ग्रॅम
₹350.00 ₹333.00
Description
सामान्य स्फोटकं, अण्वस्त्रं, रासायनिक आणि जीवशास्त्रीय अस्त्रं यांचे शोध लावून आणि उपयोग करून माणसानं पृथ्वीच्या या सुंदर क्रीडांगणाचं भयंकर रणांगण केलं आहे! गेल्या शंभर वर्षातली माणसाच्या कार्यकतृत्वाची कहाणी प्रतिभावान पण परधर्जिण्या संशोधकांची, आपल्यापुरतं पाहणा-या स्पर्धांध शासनांची; संशोधनासाठी नव्यानं उभारलेल्या नगरींची आणि बाँबखाली चिरडून गेलेल्या हिरोशिमा-नागासाकी या नरकपुरींची; प्रत्यक्ष युध्दांची-कावेबाज कारस्थानांची; फसव्या वाटाघाटींची; तुटलेल्या स्नेहसंबंधांची; माणूस या अदभूत गोष्टीची. खरं म्हणजे तुम्हाआम्हा सगळयांची! या काळोख्या कहाणीत आईनस्टाईन, लिओ झलार्ड, बर्ट्रांड रसेल, जोसेफ रोटब्लाट, मॅथ्यू मेसेलसन… अशी काही प्रकाशपानं आहेत. काळोखात काजळायचं की प्रकाशात उजळायचं, हे आपल्यालाच ठरवायचं आहे… वेळ थोडाच आहे… पण एक मार्गदर्शक मंत्र आहे- नो मोअर हिरोशिमाज्!
Additional information
pages | 370 |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.