भारत : समाज आणि राजकारण | Bharat : Samaj Ani Rajkaran
भाषा : मराठी
संवादक : डॉ. जयंत लेले (Dr. Jayant Lele)
संपादक : डॉ. प्रकाश पवार (Dr. Prakash Pawar)
अनुवाद : माधवी ग. रा. कामत (Madhavi G. R. Kamat)
पृष्ठे : ५१२
वजन : ग्रॅम
₹600.00 ₹540.00
Description
आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी तीन खंडांमधून आत्मचरित्र लिहिण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात त्यातील एकच खंड प्रकाशित होऊ शकला. प्रा. जयंत लेले यांच्या प्रदीर्घ मुलाखतसत्रांतून आकारास आलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे एका अर्थाने यशवंतरावांनी लेले यांना सांगितलेले आत्मचरित्र म्हणावे लागते. ‘‘हा मी स्वत:शी करत असलेला संवाद आहे” असे स्वत: यशवंतरावच म्हणतात यात सारे काही आले. यशवंतरावांचे राज्य व राष्ट्र या दोन्ही पातळ्यांवरचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक दृष्टिकोन आणि व्यवहार यांचा हा सखोल अभ्यास आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास जागतिक पातळीवरील स्थित्यंतरांच्या संदर्भात करण्यात आलेला असल्याने तो एकमेवच मानावा लागतो. आपण मनापासून स्वीकारलेली स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे एकीकडे व प्रत्यक्ष राजकीय व्यवहार दुसरीकडे. तर प्रसंगी स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांमधील द्वंद्वावर मात करण्याची यशवंतरावांची धडपड लेले यांनी हळुवारपणे उकलली आहे. चव्हाण साहेबांची राजकीय भूमिका व शैली यांच्यासाठी त्यांनी केलेला सैद्धांतिक व्यवहारवाद हा शब्दप्रयोग अत्यंत समर्पक म्हणावा लागेल.
स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान झालेली यशवंतरावांची वैचारिक वाटचाल, स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई राज्याच्या व द्वैभाषिकाच्या कायदेमंडळात घडलेला प्रशासक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अविचलपणे राष्ट्रीय व प्रादेशिक हितसंबंधांचा मेळ घालणारा मुत्सद्दी, चिनी आक्रमणामुळे अचानकपणे अंगावर आलेली जबाबदारी पेलणारा खंबीर नेता व विचारवंत असे अनेक पैलू या ग्रंथातून उलगडतात. महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही स्तरांवरील सहकारी व स्पर्धक यांच्याशी आपल्या मानवी पातळीवरील संबंधांविषयी इतक्या स्पष्टपणे यशवंतराव कधीच बोलले नव्हते. या सर्व गोष्टींचा उपयोग राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत वावरणाऱ्यांना तर होईलच पण महाराष्ट्राने यशवंतरावांचा कृतज्ञतापूर्वक अभिमान का बाळगायचा हे देखील समजेल.
सदानंद मोरे