द क्रिमिनल माइंड सीरीज | The Criminal Mind Series
१. डार्क नेट : इंटरनेटवरची गुंग करून सोडणारी तस्करी
सर्चिंग किंवा सर्फिंगसाठी आपण जे इंटरनेट वापरतो, त्यापलीकडे प्रचंड मोठं आणि गूढगहिरं इंटरनेटचं जाळं पसरलेलं आहे. तिथे अनेक ‘काळ्या‘ , ‘अवैध‘ घडामोडी घडत असतात. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा इंटरनेटच्या या भीतिदायक ‘सीक्रेट‘ जगाची ‘डार्क‘ कहाणी.. डार्क नेट !
पाने : १३३ । किंमत : १८०/-
२. पॉन्झी स्कीम्स : कुख्यात चार्ल्स पॉन्झीची कुकर्म कथा
गुंतवणुकीवर न भूतो न भविष्यती असा परतावा देणाऱ्या पॉन्झी स्कीम्स आजही अनेकांना भुरळ घालतात आणि त्यांना भुलून लोकही फसतात ! या स्कीम्सची सुरुवात कशी झाली ? ही ‘भन्नाट‘ आयडिया कुणाची ? लोक तिला भुलले तरी कसे आणि का ? यांसारख्या अनेक प्रश्नांचा शोध घेत गुन्हेगारी मानसिकतेचा वेध घेणारी माहितीरूप गोष्ट.. पॉन्झी स्कीम्स !
पाने : १२१ । किंमत : १८०/-
३. थेरॅनॉस : ’सिलिकॉन व्हॅली’तली साहसी फसवणूक
स्टीव्ह जॉब्जला आदर्श मानणाऱ्या एका तरुणीने रक्तचाचण्यांशी संबंधित नवं तंत्रज्ञान जन्माला घालायचा ध्यास घेतला. या ‘इनोव्हेशन’मुळे वैद्यकीय क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून जाणार होता. पण हे तंत्रज्ञान तिने खरंच प्रत्यक्षात आणलं होतं का ? की ती केवळ थापा मारून मोठमोठ्या गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेत होती ? रुग्ण, डॉक्टरांपासून ते मोठमोठ्या औषध कंपन्यांची दिशाभूल करणारी थरारक कहाणी… थेरॅनॉस !
पाने : ११७ । किंमत : १८०/-
तिनही पुस्तके एकुण किंमत : ५४०/- घरपोहोच
₹500.00