दर्यादिल दारा शिकोह | Daryadil Dara Shikoh

भाषा : मराठी
लेखक : काका विधाते
पृष्ठे : ८३२
बांधणी : पुठ्ठा बांधणी

780.00 700.00

Quantity

Description

शांतीचं नंदनवन इथे निर्माण व्हावं म्हणून तो धडपडला, धर्मवेड्यांशी अविरत झुंजला. अखेर या वैचारिक लढ्यात आपले पंचप्राण उधळून गेला. उदार विचारांचं वावडं असलेल्या पाताळयंत्री औरंगजेबाने त्याची क्रुर हत्या केली. नियतीची एक चाल वाकडी पडली आणि हिंदुस्थानचं नशीब फुटलं. अराजकाच्या उंबरठ्यावर जाऊन तो उभा राहिला.
औरंगजेबाच्या प्रदीर्घ राजवटीने हा देश कुठल्याही अर्थाने कधी श्रीमंत झालेला नाही. दारा शिकोह सारख्या शांतिदूताच्या अकस्मिक अंताने मात्र तो निश्चितपणे दरिद्री झाला.
विस्मृतीच्या धुळीत गाडल्या गेलेल्या या थोर शहाजाद्याच्या हृदयस्पर्शी जीवनाचा विस्तृत पट मांडणारी ही ऐतिहासिक कहाणी !