फॅन्टॅस्टिक फेलूदा मुंबईचे डाकू | Fantastic Feluda Mumbaiche Dakoo
भाषा : मराठी
लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re )
अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )
पृष्ठे : १२०
वजन : १५० ग्रॅम
जटायूच्या ताज्या पुस्तकावर आधारित मुंबईत ‘जेट बहादुर’ नावाचा चित्रपट तयार होत असतो. त्याचे शूटिंग पाहायला फेलूदा, तोपशे आणि जटायू मुंबईत आलेले असतात. लाल शर्टातील इसमाला जटायूनी एक पाकीट दिल्यावर चित्रपटाचा निर्माता राहात असलेल्या उत्तुंग इमारतीच्या लिफ्टमध्ये एक खून होतो. फेलूदा व त्याचे सोबती अत्यंत थरारक परिस्थितीत सापडतात. हे रोमांचक रहस्य शूटिंगच्या स्थळावरील धावत्या आगगाडीत परमोच्च उत्कर्ष बिंदूला पोहचते. यात गुलबहारचा वास आहे व फेलूदाच्या थक्क करणार्या साहसाचा गंधही आहे.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे आठवे पुस्तक.
₹65.00
Description
विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
Additional information
Weight | 150 g |
---|---|
pages | 120 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.