गार्गी अजून जिवंत आहे | Gargi ajun Jivant Aahe
भाषा : मराठी
लेखक : मंगला आठलेकर ( Mangala Aathalekar )
पृष्ठे : ११६
वजन : ग्रॅम
Description
सा-या ब्रह्मवृंदासमोर याज्ञवल्क्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारे, त्याला हैराण करणारे प्रश्न विचारीत अखेर त्याला सर्वश्रेष्ठत्वाचं प्रशस्तिपत्रक देणा-या गार्गीचा काळ खूप मागे पडला. पण गार्गी अजून जिवंत आहे. एकोणीसशे चौदाच्या आसपास उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेली गुलाब! वयाच्या अकराव्या वर्षी तिनं तत्कालीन ब्राह्मणवर्गाला प्रश्न केला, `अंत्यविधीचे कार्य करण्याचा अधिकार स्त्रीला का नाही?’ नुसता प्रश्न विचारून गुलाब थांबली नाही, तर सा-या विरोधाला मोडून काढून गंगेच्या किनारी तिनं स्वतःचा घाट बांधला. रसुलाबाद घाट! तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा सा-या घाटावर दरारा आहे. भले भले ज्ञानी पंडित तिच्यासमोर नतमस्तक आहे. तिच्याकडे पाहताना गार्गीचा भास होतो. आणि मनात येतं, कोण म्हणतं गार्गी भूतकाळात जमा झाली? गार्गी अजून जिवंत आहे.
Additional information
Pages | 116 |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.