- View cart You cannot add that amount to the cart — we have 2 in stock and you already have 2 in your cart.
गुजरात फाईल्स | Gujarat Files
भाषा : मराठी
लेखिका : राणा अय्युब (Rana Ayub)
मराठी अनुवाद : डॉ. दीपक बोरगावे (Dr. Dipak Borgave)
पृष्ठे : २२४
वजन :
₹300.00
Description
“गुजरात फाइल्स : एनॉटमी ऑफ ए कवर अप” या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद “गुजरात फाइल्स : कृष्णकृत्यांचा रहस्यभेद” या नावाने झाला असून या पुस्तकाचा मराठी अनुवाद “डॉ. दीपक बोरगावे” यांनी केला आहे. इंग्रजी पुस्तक जेव्हा बाजारात आले तेव्हा या पुस्तकाने धुमाकुळ घातला हे पुस्तक आहे “गुजरातमध्ये झालेल्या 2002 च्या दंगलीवर” आधारित, या पुस्तकात दंगली घडवण्यामागे मास्टर माईंड असलेले ××× ××, ××× ××, प्रशासनातील विकलेले अधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद आणि हरेन पांडे यांची झालेली हत्या, इशरत जहाँ, सोहराबुद्दीन शेख और तुलसीराम प्रजापति कथित खोटी चकमक (Fake Encounter) या सगळ्या क्रूरतेचा लेखाजोखा या पुस्तकाच्या “पत्रकार लेखिका राणा अय्युब” यांनी “स्टिंग ऑपरेशन” करून मांडला आहे. “राणा अय्युब हया स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार असून तहेलकाच्या माजी संपादक” आहेत. “शोध पत्रकारिता” करून काय करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे “गुजरात फाइल्स : कृष्णकृत्यांचा रहस्यभेद” या पुस्तकाची “इंग्रजी आवृत्ती 2016” ला बाजारात आली आणि पाहता पाहता या पुस्तकाच्या एक “वर्षात 1 लाख 80 हजार” प्रती हातोहात विकल्या गेल्या. हे पुस्तक डझनभर भाषेत अनुवादीत झाले असून राजकारणात आणि सत्ता मिळवण्यासाठी असे काही केले जाऊ शकते यावर आपला विश्वास सुद्धा बसणार नाही. एक शब्दात सांगायचे झाले तर “पुस्तक डेंजर” असे आहे. सद्या या पुस्तकाची “मराठी आवृत्ती” बाजारात उपलब्ध आहे. पत्रकार, अभ्यासक, विद्यार्थी, राजकारणी, व्याख्याते आणि समस्त ××भक्त यांनी वाचावे असे उत्तम पुस्तक आहे. पुस्तका विषयी “जस्टिस बी एन श्रीकृष्ण” म्हणतात “धूर्त आणि लबाड राजकारणाच्या या काळात… शोध पत्रकारितेचा एक आदर्श नमुना” म्हणजेच “गुजरात फाइल्स : कृष्णकृत्यांचा रहस्यभेद”
Reviews
There are no reviews yet.