जगण्याचा जळत्या वाटा | Jaganyachya Jalatya Vata

भाषा : मराठी
लेखक : उत्तम कांबळे ( Uttam Kambale )
पृष्ठे : 
वजन :   ग्रॅम

Original price was: ₹200.00.Current price is: ₹156.00.

Description

माणसाला जगायला खूप आवडतं पण सार्‍यांच्याच

वाट्याला काही सुलभ आयुष्य कधी येत नाही.

मुठीतून निसटणारं आणि व्यवस्थेच्या जबड्यात जाणारं

आयुष्य ओढून घेणारे आणि त्याला जमेल तसा आशय

देणारे अनेक जण मी पाहिले आहेत. मला अशी लढती

आणि जळतीही माणसं पाहायला, त्यांना समजून घ्यायला

खूप आवडतं. तर काही जण श्‍वासा-श्‍वासासाठी,

काही जण घासा-घासासाठी तर काही जण व्यवस्थेचा

फासा उलटवून टाकण्यासाठी लढत असतात.

या सार्‍यांतून जगण्याची वाट तापत जाते, स्फोटक होते;

तर अनेक वाटा जळत्याच राहातात. त्यातूनही जगणं

पुढं सरकत राहातं. अशा अनेकांच्या जगण्याच्या

जळत्या वाटा मी पाहिल्या आणि त्या शब्दबद्ध केल्या.

वाटा जरी जळत्या असल्या तरी त्या प्रचंड ऊर्जा

देणार्‍याही आहेत. मला ऊर्जा देणार्‍या वाटा वाचकांनाही

ऊर्जा देत राहतील, असा मला विश्‍वास आहे.