जिगसॉ | Jigasaw

भाषा : मराठी
लेखक : रामदास भटकळ  ( Ramdas Bhatkal )
पृष्ठे : २४८
वजन : ग्रॅम

225.00 214.00

Quantity

Description

जिगसॉ’बाबत पहिली गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळात, व्यक्तिचित्रांच्याच नव्हे, तर इतर कोणत्याही पुस्तकानं मला इतकं गुंतवून ठेवलं नव्हतं. यातली बरीच माणसं माझ्या व्यक्तिविशिष्ट परिचयातली. त्यामुळे तीही उत्सुकता होती. पण लेख वाचल्यावर ह्या व्यक्तींची – अगदी जवळच्याही – नव्यानं ओळख होतेय, असं मला वाटलं. जी माणसं अपरिचित होती, तीही खूप जवळ, अगदी हस्तांदोलनाच्या अंतरावर आल्यासारखं वाटलं. ही तुमच्या लेखनाची करामत. ती मला खरोखरच थक्क करणारी होती. त्यात एक आनंददायक अपेक्षाभंग होता. इतकं अव्वल दर्जाचं लेखन तुम्ही करू शकता, हे मला माहीत नव्हतं. चित्रकार समोर ठेवलेल्या वस्तूचं वा दृश्याचं बारकाईनं निरीक्षण करतो आणि आपल्याला जाणवलेल्या रूपात, रंगात त्याचं चित्रण करतो – त्यात तटस्थता असते, पण त्रयस्थता नसते. निवड करताना त्या दृश्याशी तो एका भावबंधनाने जोडलेला असतो. विविध क्षेत्रांतील आणि पातळयांवरील व्यक्तींच्या वृत्तींची आणि कृतींची अलगद हातानं उकल करण्यात तुम्ही अशीच आप्तसंबंधांचं भान ठेवणारी तटस्थता राखलेली आहे. कोठेही भावविवशता नाही, पण कोरडेपणाही नाही. पाणलोट नाहीत, पण अधिक हृद्य वाटणारा ओलावा आहे. प्रेमादर अंध नाही, डोळस आहे. पण त्या दृष्टीतही सर्वत्र आत्मीयतेचं मार्दव आहे. आणि मुख्य म्हणजे ह्या सर्वाला समर्थक अशी नितळ, सरळ पण प्रगल्भ अशी भावशैली आहे. तिला ‘मेकअप’ करण्याचा प्रयत्न (आम्ही करतो तसा) कोठेही दिसत नाही. एवढंच सांगतो, कलमाई तुमच्यावर प्रसन्न आहे. ती अधिक काही मागते आहे. – वि. वा. शिरवाडकर

Additional information

pages

248

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जिगसॉ | Jigasaw”