कोवळ्या आई बाबांसाठी | Kovalya Aai – Babansathi
भाषा : मराठी
लेखक : डॉ. लिली जोशी ( Dr. Lili Joshi )
पृष्ठे : १४४
वजन : १८० ग्रॅम
झटपट शिक्षण…झटपट नोकरी…झटपट लग्न…आणि झटपट पोरं-बाळं! थांबा… सर्वच झटपटच्या या जमान्यात मूल होऊ देण्याचा निर्णय मात्र असा झटपट नाही हं घेतला जात. आजची तरुण पिढी विचारपूर्वक आणि सजगपणे पालकत्वाचा निर्णय घेताना दिसते. मात्र माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात माहितीचं ज्ञान कितीही पालथं घातलं तरी अनुभव तर पहिलाच असतो ना?
₹125.00 ₹110.00
Description
म्हणूनच आजच्या कोवळया आणि नवख्या आई-बाबांसाठी डॉ. लिली जोशी यांचं हे पुस्तक म्हणजे हसत खेळत मार्गदर्शन करणारा आणि पालकत्वाच्या जबाबदारीची ओढ निर्माण करणारा एक आनंददायी अनुभवच आहे.
आजकालच्या प्रेग्नन्सीचे वेगवेगळे फंडे, प्रसूतीचे विविध प्रकार, आईच्या दुधाचं महत्त्व, बाळाची झोप-अंघोळ, त्याचे कपडे, त्याचा आहार, त्याचे ताई-दादा, बाळाच्या संगोपनामधला बाबांचा सहभाग, बाळाचं पाळणाघर, दत्तक घेतलेल्या मुलाचं संगोपन…अशा बाळाशी निगडित सर्व कळीच्या मुद्दयांवर लेखिकेने सहज सुंदर मार्गदर्शन केलं आहे. या पुस्तकात पारंपरिक चाली-रीती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची सुंदर सांगड घातलेली आपल्याला दिसेल.
… नवरा-बायकोच्या नात्यातून आई-बाबांच्या भूमिकेत पदार्पण करणार्या सर्व कोवळया आई-बाबांसाठी!
Additional information
Weight | 180 g |
---|---|
pages | 144 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.