|| अलिजबहाद्दर महाराज माधवराव उर्फ महादजी शिंदे यांचे चरित्र व कारकीर्द ||

भाषा : मराठी
लेखक : विष्णू रघुनाथ नातू ( Vishnu Raghunath Natu )
पृष्ठे : 324

मुंबई हायकोर्टचे वकिल असलेले कै. अॅड विष्णू रघुनाथ नातू म्हणजे मोठे अभ्यासू आसामी !
1894 सालापर्यंत मराठा इतिहास संशोधनात महानथोर महारथी संशोधकाचा शिरकाव अजून झाला नव्हता. इतिहासाचार्य राजवाडे , पटवर्धन, पोतदार, बेंद्रे, शेजवलकर, पुरंदरे द्वयी आदींचा इथपर्यंत उदय झाला नव्हता. अशा समयी मराठा दौलतीचे ऊत्तरेकडील महान सरदार महादजी शिंदे सरकार वरील संदर्भपर ग्रंथाचे लेखन करून १२ फेब्रुवारी १८९४ म्हणजेच महादजीबोवांच्या पुण्यतिथीला १०० वर्ष पूर्ण झाली त्या दिवशी हा अद्वितीय ग्रंथ प्रकाशित झाला.

महादजी पाटीलबोवा म्हणजे आकाशाएवढं ऐसपैस चरित्र. मात्र ह्या पात्रास पहिल्यांदाच नातूंनी शब्दलंकारीनी नटवले.. संदर्भरत्नांनी जडवले.. हेच अद्वितीय चरित्र २७ फेब्रुवारी २०२० म्हणजेच प्रथम प्रकाशनाच्या १२६ वर्षानंतर आणि महादजीबोवांच्या २२६ व्या पुण्यतीथीवर्षी पार्श्व प्रकाशन कोल्हापूर द्वारा हे दुर्मिळ पुस्तक पुन्हा वाचकांसमोर आणि इतिहासप्रेमींसमोर येत आहे.

रंगीत आणि कृष्णधवल छायाचित्रे तसेच उत्कृष्ठ बांधणी आणि पानांसह ३२४ पानांच्या ह्या ग्रंथाची किंमत रु. ४००/- आहे. प्रकाशनपुर्व सवलत किंमत ३००/- आहे. तसेच महाराष्ट्रभर घरपोहोच कुरिअर अथवा पोस्टाने हवे असल्यास रु. ४०/-  अधिक लागेल.

आजच ह्या दुर्मिळ ग्रंथाची आपली प्रत राखुन ठेवा !!

 

400.00 360.00