मुस्लिम मनाचा शोध | Muslim Manacha Shodh

भाषा : मराठी
लेखक शेषराव मोरे ( Sheshrav More )
पृष्ठे : ७७६
वजन :  ग्रॅम

800.00 760.00

Quantity

Description

मुस्लिम मन मुख्यत: इस्लाममधून घडलेले आहे. ‘मुस्लिम मनाचा शोध’ म्हणजे पर्यायाने मूळ इस्लामचा अभ्यास होय. मूळ इस्लामचा अभ्यास म्हणजे मूलत: तीन गोष्टींचा अभ्यास : मुहंमद पैगंबरांचे चरित्र, कुरआन व हदीस. या तीनही बाबी परस्पराधारित आहेत. पैगंबर चरित्राचा अभ्यास केल्याशिवाय कुरआनातील वचनांचा अन्वयार्थ कळत नाही. ‘कुरआन’ म्हणजे एक प्रकारे प्रेषितांच्या जीवनाचे प्रतिबिंब होय. ‘प्रेषितांच्या उक्ति व कृती’ म्हणजे ‘हदीस’ होय. ‘हदीस’ म्हणजे एक प्रकारे कुराणाचा शब्दकोश होय. कुराणातील वचनांचा अर्थ लावण्यासाठी ‘हदीस’चाही आधार घ्यावा लागतो. या तीनही बाबींचा एकत्रित अभ्यास केला, तरच मूळ इस्लामचे सम्यक आकलन होऊ शकते. असा अभ्यास करून लिहलेला हा ग्रंथ आहे. प्रेषितांनंतरच्या काळात इस्लाममध्ये अनेक पंथ निर्माण झाले. पण या सर्व पंथांना एकमताने मान्य असणारा हा मूळ इस्लाम प्रत्येकाने समजून घेणे काळाची गरज आहे.

Additional information

pages

776

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुस्लिम मनाचा शोध | Muslim Manacha Shodh”