नवरत्ने हरपली रणांगणी | Navratne Harapali Ranangani

भाषा : मराठी
लेखक : कॅप्टन वासुदेव बेलवलकर ( Captain Vasudev Belvalkar )
पृष्ठे : ७२०
वजन : ८४९ ग्रॅम

650.00 560.00

Description

नरवीर दत्ताजीराव शिंदे एकांड्या शिलेदाराप्रमाणे अब्दालीच्या दुराणी फौजेबरोबर झुंज देत असताना कोठूनशा आलेल्या जेजालाच्या गोळीने जखमी होऊन घोड्यावरून धरणीवर कोसळले. ते पाहून, अब्दालीचा एक रिशतेदार कुत्बशहा आणि नजिबतखान यांनी एकच गिल्ला केला व आपआपल्या समशेरी परजुन छद्मीपणे विकट हास्य करुन त्यास पुसले,
“क्यो दत्तोजी शिंदे ? हमारे साथ फिर लढेंगे ?”
रक्तस्रावाने डोळ्यांवर येणारी झापड मोठ्या मनोनिग्रहाने रोखून तो नरवीर गर्जला, “क्यू नही, बचेंगे तो और भी लढेंगे”
“क्या ये हिम्मत?” असे म्हणून कुत्बशहाने आपल्या समशेरीचे आधार पाते कसायाच्या सुऱ्याप्रमाणे त्यांच्या मानेवर फिरवून त्या नरवीराचा शिरच्छेद केला.
मर्द मराठ्यांच्या दरबारी जी काही शूर मर्दानी नवरत्ने होती त्यात उमदे दत्ताजीराव शिंदे हे प्रमुख होते आणि म्हणूनच पानिपतचा रणसंग्राम महाराष्ट्राला कायमची स्फूर्ती देणारा झाला आहे. त्याच शुरविर दत्ताजीराव शिंदे ह्यांची कथा ह्या कादंबरीत वाचायला मिळेल.

Additional information

Weight 849 g
pages

720

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नवरत्ने हरपली रणांगणी | Navratne Harapali Ranangani”