रविश कुमार द फ्री व्हॉइस | Ravish Kumar The Free Voice
भाषा : मराठी
लेखक : रविश कुमार ( Ravish Kumar )
अनुवाद : सुनील तांबे ( Sunil Tambe )
पृष्ठे : १८४
वजन : २२४ ग्रॅम
रविश कुमार हे वर्तमान भारतातील मोजक्या धैर्यवान आणि प्रगल्भ पत्रकारांपैकी एक आहेत. भारतीय समाज आणि राजकारणाची इतकी खोलवर समज असलेले आणि कठोर सत्यनिष्ठा असलेले फार थोडे पत्रकार आज आहेत. प्रभावीपणे सत्य मांडण्याची हातोटी आणि प्रामाणिकपणाही फार थोड्या पत्रकारांत आढळतो. या पुस्तकात अनेक विषयांचा परामर्श त्यांनी घेतला आहे आणि तो घेतानाच लोकांचा सोशल मिडीया किंवा मुख्य प्रवाहातील मिडियातून बोलण्याचा अवकाश किती आहे आणि तो अवकाश दिवसेंदिवस कोंडला जातो आहे यावरची निरिक्षणे ते मांडतात. निर्भय अभिव्यक्तीला असलेला धोका वाढत चालला आहे, सेन्सॉरशिपचा विळखा आवळतो आहे, संस्थात्मक, मानसिक आणि शारीरिक हिंसेची शक्यता वाढत चालली आहे, त्यामुळे सुसंस्कृत चर्चा, संवाद, सामाजिक सुसंवाद यांच्या जागी असहिष्णुता आणि व्देषाचे राज्य येते आहे हे या पुस्तकात रविश कुमार यांनी स्पष्टपणे मांडले आहे. माध्यमे, लोकप्रतिनिधी आणि देशातील इतर अनेक संस्था मिळून लोकांचा घात करत आहेत याचीही संगतवार मांडणी ते करतात.
₹250.00
Description
सर्वात महत्वाचे म्हणजे या लोकशाही देशात अलिकडे नष्टप्राय होत चाललेली बुध्दीगामी प्रगतीची, सर्वसमावेशक आणि खरोखरची लोकशाही परंपरा पुनःप्रस्थापित करण्यासाठी आपण नगरिक या नात्याने काय करायला हवे, याचेही विवरण ते करतात. “द फ्रि व्हाइस” हे पुस्तक कधी तिरकस कधी सडेतोड आणि सातत्याने सखोल गंभीर शैलीत, देशाच्या सद्य परिस्थितीवर वृत्तांकना-सारखीच टिपण्णी करते. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि त्यावर विचार करावे असे आहे.
Reviews
There are no reviews yet.