समुद्रच आहे एक विशाल जाळं | Samudrach Aahe Ek Vishal Jal

भाषा : मराठी
लेखिका : कविता महाजन ( Kavita Mahajan )
पृष्ठे : ९२
वजन :  ग्रॅम

Original price was: ₹100.00.Current price is: ₹95.00.

Quantity

Description

कविता महाजन यांच्या या दीर्घकवितेत एका मासळीचे समुद्रातले जीवन चित्रित करण्यात आले आहे. या कवितेत सलगपणे रेखाटले गेलेले मत्स्यजीवनाचे चित्र हे अंतिमत: मानवी जीवनाचेच चित्र बनून जाते. मानवी जीवनासंबंधीच्या सनातन आणि मूलभूत जाणिवांचा व्यापक पट या दीर्घकवितेने आपल्या कवेत घेतला असून तो मत्स्यजीवनाच्या संदर्भात अर्थपूर्ण बनवला आहे. माणसाच्या ठिकाणी स्वाभाविकपणे असलेली जिजीविषा आणि तिच्याशी अतूटपणे संलग्न असलेली गूढ अशी मृत्युप्रेरणा यांचे प्रभावी व प्रत्ययकारी चित्र या कवितेत रेखाटले गेले आहे. मानव ज्या जगात जगत असतो त्या जगापेक्षा वेगळया जगाची त्याला वाटणारी ओढ, मुळात व्यामिश्र असलेल्या आणि त्यामुळे अल्प प्रमाणात आकलनीय असलेल्या या जगासंबंधीचे आणि या जगापलीकडचे जे अज्ञात आहे ते जाणून घेण्याची मानवाच्या ठिकाणी असलेली ऊर्मी, इच्छाआकांक्षांच्या तृप्तीची मानवाची धडपड आणि त्यात त्याला प्राप्त होणारे विपरीत फल, सभोवतालाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही तो साधला जाण्यातील अशक्यता, अशा या प्रतिकूल परिस्थितीमुळे जाणवणारी जीवनाची निरर्थकता, आशयशून्यता आणि त्यातून निर्माण होणारी परकेपणाची-एकाकीपणाची भावना, त्यामुळे बलिष्ठ होत जाणारी मृत्युप्रेरणा, अशा मूलगामी, सनातन जाणिवांचा प्रत्यय या दीर्घ कवितेत घडवला गेला आहे. मराठी काव्यपरंपरेत दीर्घकवितांची निर्मिती अल्प प्रमाणात झालेली आहे आणि आजही मराठी कवींना हा आव्हानात्मक काव्यप्रकार आकर्षित करून घेताना दिसत नाही. अशा परिस्थितीत कविता महाजनांची `समुद्रच आहे एक विशाल जाळं’ ही एकाच वेळी कथात्म आणि चिंतनात्म रूप धारण करणारी दीर्घकविता मराठी काव्यपरंपरेतील ही उणीव काही प्रमाणात दूर करणारी ठरणार आहे.