सर्वांसाठी आरोग्य ? होय शक्य आहे | Sarvansathi Aarogya ? Hoy Shakya ahe

भाषा : मराठी
लेखक :  डॉ. अनंत फडके ( Dr. Anant Fadake )
पृष्ठे : २०८
वजन :   ग्रॅम

भारतात अजूनही कोट्यवधी लोक चांगल्या आरोग्यसेवेपासून वंचित आहेत. हे आजचे चित्र बदलून ‘सर्वजनतेला दर्जेदार आरोग्यसेवा देणे शक्य आहे’ असे साधार मांडणारे हे पुस्तक आहे.

सरकारच्या औषध-धोरणातील चुका सुधारून ‘सर्वांसाठी औषधे’ हे ध्येय गाठणे कसे शक्य आहे, हे सुरुवातीच्याप्रकरणात मांडले आहे. सरकारी दवाखाने, रुग्णालये इथे सर्व आवश्यक औषधे मोफत देणे, तसेच औषधदुकानांतील किमती सध्याच्या एकचतुर्थांश करणे कसे शक्य आहे, याचा उलगडा ही मांडणी करताना केलाआहे.

250.00 195.00

Quantity

Description

खाजगी वैद्यकीय सेवेत कोणते गंभीर दोष आहेत; ‘सर्वांसाठी आरोग्यसेवा’ या ध्येयाच्या ते कसे आड येतात;इतर अनेक देशांप्रमाणे भारतातही ‘प्रमाणित सेवेसाठी प्रमाणित दर’ या तत्त्वानुसार सरकारने गरजेप्रमाणेखाजगी सेवा विकत घेणे हा त्यावर उपाय कसा आहे, हे मधल्या प्रकरणात आहे.

‘सर्वांसाठी आरोग्यसेवा’ हे ध्येय गाठण्यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवेत कोणत्या आमूलाग्र सुधारणा करायलाहव्यात याची चर्चा शेवटच्या प्रकरणात केली आहे.

सखोल अभ्यास व ‘जन आरोग्य चळवळी’तील प्रदीर्घ अनुभव यांच्या आधारे लिहिलेले हे पुस्तक वाचकालाबरेच काही देऊन जाईल.

Additional information

pages

208

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सर्वांसाठी आरोग्य ? होय शक्य आहे | Sarvansathi Aarogya ? Hoy Shakya ahe”