शहामतपनाह बाजीराव | Shahamatpanah Bajirao

बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर पेशवाई कोणास द्यावी हा प्रश्न उभा राहिला असता दरबारी मुत्सद्दी म्हणाले, “बाजीरावसाहेब बहुत उद्दाम प्रकृतीचे ! शिपाईगिरीत अवघा वेळ मग्न. राज्यकारभार चालवावयास सबुरी असावी तो भाव नाही”. पण अंती शाहू महाराजांनी त्यांनाच पेशवेपदाची धुरा दिली, आणि बाळाजीपंतनानांच्या या मुलाने शाहू महाराजांचा विश्वास सार्थ करून दाखवला. पुण्यश्लोक शिवछत्रपती महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला विस्तारक दृष्टी देणाऱ्या या ईश्वरदत्त सेनानीने शत्रूला अक्षरशः सळो की पळो करून सोडले. पाठीवर भाला घेऊन घोडदौड करणाऱ्या, जाता जाता सहज शेतातील बाजरीची कणसे खाणाऱ्या या मराठ्यांच्या पेशव्याची तसबीर जेव्हा दिल्लीच्या बादशहाने पाहिली तेव्हा त्याच्या तोंडून नकळत उद्गार बाहेर पडले, “ये तो सैतान है !” निजामाने सुद्धा बाजीरावांचं वर्णन करताना ‘शहामतपनाह’ म्हणजे शौर्यस्थान असं केलं आहे. अशा या पेशव्याची ही संदर्भासहित रणशौर्यगाथा – शहामतपनाह बाजीराव !

लेखक : कौस्तुभ कस्तुरे
साहित्य प्रकार : चरित्र
प्रकाशक : राफ्टर प्रकाशन

Category:

390.00 350.00

Quantity