सिध्दार्थ जातक | Siddharth Jatak

गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर आधारित कथा पाली भाषेत लिहिल्या गेल्या आहेत. त्या ‘जातके’ किंवा जातककथा म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा दुर्गा भागवत यांनी मराठी मध्ये केलेला अनुवाद म्हणजेच ’सिध्दार्थ जातक’.
जातक ह्या शब्दाचा अर्थ ‘जन्मासंबंधी’ असा आहे. ह्या जातककथांतून बुद्ध हा ‘बोधिसत्त’ (बोधिसत्व) ह्या नावाने कथानायक, कथेतील दुय्यम पात्र वा कथेतील घटनांचा एक प्रेक्षक म्हणून वावरलेला आहे.
ह्या जातककथा अतिशय मनोरंजक, बोधप्रद आणि व्यवहारचातुर्याने त्याचप्रमाणे तत्वज्ञानाने भरलेल्या आहेत. मुलांना कावळा, कोल्हा, तित्तिर वगैरेंच्या गोष्टी, स्त्रियांना पातिव्रत्य शिकवणाऱ्या, त्यांच्यातल्या उत्तम मुलीचा, पत्नीचा, मातेचा, व सुनेचा गौरव करणाऱ्या आणि कुटील दुःशील स्त्रियांचा धिक्कार करणाऱ्या, तरूणांना व्यवहार-नीती शिकवणाऱ्या, वृद्धांना शांतीचे व सहनशीलतेचे पाठ देणाऱ्या आपापल्या मर्यादा ओळखून स्थूल व्यवहारापालिकडे नजर टाकायला साऱ्यांना सांगणाऱ्या नर्म विनोद, उपरोध, कारुण्य आणि शहाणपणाने या कथा भरलेल्या आहेत.

वजन : २.७ किलो । एकुण खंड : ७
पाने : ३००० । प्रथम प्रकाशन : १९७५
सर्व पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर केलेली छपाई

3,000.00 2,700.00

Quantity