सुंदर पिचई गूगलचं भविष्य | Sundar Pichai Googlecha Bhavishya
भाषा : मराठी
लेखक : जगमोहन भानवर ( Jagmohan Bhanavar )
अनुवाद : रमा हर्डीकर – सखदेव ( Rama Hardikar – Sakhadev )
पृष्ठे : १४४
वजन : ग्रॅम
पिचईचा ‘मिडास टच’ लाभलेल्या ‘गूगल’ने आता नवी भरारी घेतली आहे.
या पुस्तकात पिचईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, ‘गूगल’मधल्या प्रवेशापासून ते सीईओ पदापर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास, त्याने ठामपणे घेतलेले निर्णय, पेललेली आव्हानं, ‘गूगल’ला प्राप्त करुन दिलेलं अत्युच्च स्थान याचा उहापोह रंजकपणे आणि प्रभावीपणे केला आहे. सुंदर पिचई आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनलेलं ‘गूगल’ यांच्या यशाचं मर्म सांगणारं आणि २१व्या शतकातलं बहुपेडी नेतृत्त्व कसं असावं आणि ते कसं घडतं हे उलगडून दाखवणारं पुस्तक
सुंदर पिचई – गूगलचं भविष्य…
₹160.00 ₹141.00
Description
जागतिक स्तरावरची महाकाय टेक कंपनी ‘गूगल’ आणि तिचा चेहरामोहरा पालटून टाकणाऱ्या एका भारतीय तरुण नेतृत्त्वाची ही आहे झंझावाती कहाणी…
तरुण वयाचा सुंदर पिचई तंत्रज्ञानावरचं आपलं निरपवाद प्रभुत्त्व सिद्ध करत ‘गूगल’मध्ये यशाची शिडी झपाट्याने चढत होता. साहजिकच ‘गूगल’च्या ‘सीईओ’पदी पिचईची झालेली निवड स्पर्धक कंपन्यांनाही अनपेक्षित नव्हती. उलटपक्षी त्याच्या नेतृत्त्वाखाली ‘गूगल’ नव्या आव्हानांना कसं तोंड देतं, याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती. तंत्रज्ञानाच्या प्रभुत्त्वाबरोबरच पिचईकडे भविष्याचा वेध घेणारी ‘व्हिजन’ होती. सोबतीला व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्यांची जोड होती. माणसांना एकत्र घेऊन काम करण्याची हातोटी होती. त्याच बळावर त्याने क्रोम, क्रोम ओएस, अँड्रॉइड वगैरे उत्पादनं विकसित केली. ही उत्पादनं आता जगावर अधिराज्य गाजवत आहेत.
Additional information
pages | 144 |
---|
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.