तुमचा सच्चा साथीदार | Tumcha Saccha Sathidar

भाषा : मराठी
लेखिका : सुब्रोतो बागची ( Subroto Bagachi )
अनुवाद : प्रणव सखदेव ( Pranav Sakhadev )
पृष्ठे : १६०
वजन : २७५ ग्रॅम

चांगला उद्योजक / व्यावसायिक / नोकरदार होण्यासाठी
तुम्ही ‘जागरूकपणे’ प्रयत्न करायला तयार आहात?

सुप्रसिद्ध लेखक, ‘माइंडट्री’ कंपनीचे संस्थापक सुब्रोतो बागची यांनी
‘द प्रोफेशनल’ (मराठी  आवृत्ती : मैत्री व्यावसायिकतेशी) हे पुस्तक लिहिलं आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या पुस्तकात त्यांनी व्यावसायिकतेबद्दल त्यांच्या अनुभवांआधारे भाष्य केलं होतं, तर ‘तुमचा सच्चा साथीदार’मध्ये त्यांनी व्यावसाययिकांमध्ये आवश्यक असणार्‍या‍ गुणांचा विकास व्हावा, यासाठी एका वर्कबुकचीच निर्मिती केली आहे.

Original price was: ₹195.00.Current price is: ₹172.00.

Quantity

Description

 

या पुस्तकात त्यांनी चांगला व्यावसायिक होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५ गुणांबद्दल थोडक्यात, पण मौलिक माहिती दिली आहे. तसंच हे गुण आपल्या अंगी कसे बाणवावेत, ते अधिकाधिक विकसित कसे करावेत, हे आपलं आपल्यालाच समजावं यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रश्नही विचारले आहेत. त्यांची उत्तरं देण्यासाठी पुस्तकात मोकळ्या जागा देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी आपल्याला सामोरे जावे लागणारे, आपल्या क्षमतांचा कस लावू पाहणारे वेगवेगळे घटना-प्रसंगही देण्यात आले आहेत. त्या घटना-प्रसंगांत तुम्ही कसं वागाल, काय कृती कराल हे पुस्तकात लिहायला सांगितलं आहे. कधीकधी आधी दिलेल्या उत्तरांचं पुनरावलोकन करायलाही सांगितलं आहे.

‘प्रत्यक्ष स्वाध्याय’ करायला लावून स्वत:च्या आत डोकवायला लावणारं हे आगळंवेगळं पुस्तक सगळ्या व्यवासायिकांना, उद्योजकांना आणि नोकरदारांना मौलिक मार्गदर्शन तर करेलच, शिवाय व्यावसायिक जीवनातला ‘तुमचा सच्चा साथीदार’ही होईल !