उद्योजक संच – १२ पुस्तके

१. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा
केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या समजुतीलाच छेद देऊन भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो हे सांगणारे महत्वाचे पुस्तक.
सुरेश हावरे । रु. १७०/-

२. उद्योग करावा ऐसा
शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या धडाडीच्या २१ उद्योजकांच्या मुलाखतीतुन उलगडलेली बिझनेस सिक्रेट्स सांगणारे आणि नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी उद्युक्त करणारं पुस्तक.
सुरेश हावरे । रु. ३००/-

३. स्टार्टअप मंत्र
अभिनव संकल्पना, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, मेहनती टीम आणि मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसायवृद्धीच्या संधी या घटकांवर स्टार्टअप्स कसे यशस्वी होतात, हे या पुस्तकात उलगडलं आहे.
सुरेश हावरे । रु. १७५/-

४. तुम्हीही व्हा धडाडीचे उद्योजक
काहीतरी उद्योग करणं वेगळं आणि तो धडाडीने व कार्यकुशलतेने करणं वेगळं. यासाठी तुमच्यातील प्रेरणा महत्त्वाच्या ठरतात. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणांचा स्रोत दाखवतं, तुमच्यातील प्रेरणांना जागं करुन दिशा दर्शवतं.
सुब्रोतो बागची । रु. २००/-

५. व्यवसायातील इंप्रेसिव्ह मॅनर्स
तुमचा आवाज, शब्दांची निवड, तुमची वेषभूषा, देहबोली या सर्वांचा परिणाम व्यवसायात होत असतो. आपलं करिअर ‘प्रभावित’ करणार्‍या अशा सर्व कळीच्या मुद्दयांवर मार्गदर्शन करणारं पुस्तक.
शीतल कक्कर मेहरा । रु. १८०/-

६. तुमचा सच्चा साथीदार
चांगला व्यावसायिक होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५ गुणांबद्दल थोडक्यात, पण मौलिक माहिती देणारे तसेच हे गुण आपल्या अंगी कसे अधिकाधिक विकसित कसे करावेत हे सांगणारं पुस्तक.
सुब्रोतो बागची । रु. १९५/-

७. मैत्री व्यावसायिकतेशी
व्यावसायिकता म्हणजे केवळ प्रचंड नफा मिळवणं नव्हे, तर उच्च नीतिमूल्यांची जोपासना करून उत्तम नियोजनातून तो मिळविणं. या पुस्तकात व्यावसायिकता कशी जोपासावी, हे सूचकपणे सांगीतले आहे.
सुब्रोतो बागची । रु. १७५/-

८. आंत्रप्रन्योरशिप
जगप्रसिध्द लेखक ब्रायन ट्रेसी यांचे स्वत:चा व्यवसाय चालु करुन कसा उत्तरोत्तर विकसीत करावा याबाबत इत्यंभुत मार्गदर्शन करणारे महत्वाचे पुस्तक.
ब्रायन ट्रेसी । रु. २५०/-

९. उद्योगात सारे काही शक्य असते
उद्योगात-व्यवसायात हमखास यश प्राप्त करण्यासाठीची मूलभूत तत्वे तसेच यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती आणि केस स्टडीज यांच्या माध्यमातून या पुस्तकाला वेगळी उंची लाभली आहे.
किरण भट, शेखर सेषन । रु. २२५/-

१०. मी होणारच परफेक्ट बिझनसमेन
यशस्वी व्यवसायाच्या उभारणीसाठी आवश्यक अशा घटकांचे स्वरूप स्पष्ट करणारे आणि ते छोट्या – मोठ्या उदाहरणांद्वारे मांडणारे हे पुस्तक आहे.
सुधाकर घोडेकर, दिलीप देशपांडे । रु. २५०/-

११. स्वप्न पहा उघड्या डोळ्यांनी
उद्योजकांसाठी अत्यंत महत्वाचे गुण आणि अवगुण, नियोजणाचे महत्व, समस्यांना आणि अपयशाला सामोरे जाण्याचा दृष्टिकोन अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे म्हणजेच हे पुस्तक.
रॉनी स्क्रुवाला । रु. २५०/-

१२. नावीन्यपूर्ण बदल घडवताना
११ भारतीय उद्योजकांनी अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य करून दाखवल्या. त्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रेरणादायी प्रवास म्हणजे हे पुस्तक.
पोरस मुन्शी । रु. २३०/-

एकुण किंमत : २७५०/- ( मुळ एकुण किंमत २६००/- + कुरिअर १५०/- वजन ३.० किलो )
सवलत किंमत : २५००/- कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच
एकुण वजन : ३.० किलो

2,750.00 2,500.00

Quantity