वा. सी. बेंद्रे लिखित ३ दुर्मिळ संशोधक ग्रंथ | V S BENDRE 3 BOOKS
महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनाला अचूक दिशा दाखवणारे, इतिहासाचे भीष्माचार्य अर्थात वा. सी. बेंद्रे. या महान इतिहास संशोधकाच्या लेखणीतून अवतरलेले ३ दुर्मिळ संशोधक ग्रंथ दिनांक २३ एप्रिल पासुन प्राकृत प्रकाशन, पुणे द्वारा इतिहासप्रेमी वाचकांसाठी उपलब्ध होत आहे. इतिहासप्रेमी आणि अभ्यासक हे ग्रंथ प्रकाशनपुर्व सवलतीत आरक्षित करु शकता.
१. साधन चिकित्सा
इतिहास या विषयाची गीता मानला गेलेला ग्रंथ. इतिहासाचा चौमितीय अभ्यास शिवशाहीच्या दृष्टीने चर्चात्मक रूपाने या ग्रंथामध्ये बेंद्रे यांनी मांडलेला आहे. इतिहास अभ्यासकांना अनेकवर्ष दुर्मिळ असलेला हा ग्रंथ आता उपलब्ध होत आहे.
किंमत : ४५०/- । पुठ्ठाबांधणी
२. गोवळकोंड्याची कुत्बशाही
शिवशाहीचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तत्कालीन आजूबाजूच्या इस्लामी राज्यकर्त्यांचा इतिहास देखील महत्त्वाचा ठरतो. अशाच शिवशाहीला अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्या कुतुबशाहीचा इतिहास असणारा हा ग्रंथ मराठी व इंग्रजी मध्ये लिहिलेला आहे.
किंमत : ४५०/- । पुठ्ठाबांधणी
२. जिंजीचा प्रवास
औरंगजेबाने रायगड मिळवल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी तमिळनाडूतील जिंजीच्या किल्ल्याचा आसरा घेतला. त्यांचा रायगड ते जिंजीच्या प्रवासाचे वर्णन असलेला हा ग्रंथ मराठी, संस्कृत आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये लिहिलेला आहे.
किंमत : २००/- । साधीबांधणी
प्रकाशन : २३ एप्रिल २०२२
एकुण किंमत : ११००/-
प्रकाशनपुर्व सवलत किंमत : ९००/- (२०% सवलत + २०/- पोस्टल)
वितरण : २५ एप्रिल २०२२
₹1,100.00 ₹1,060.00