वेध नक्षत्रांचा | Vedh Nakshatrancha

भाषा : मराठी
लेखक : अमित अतूल पाटणकर ( Amit Atool Patankar )
पृष्ठे : ८०
वजन : २३० ग्रॅम
चमकणारे तारे, नक्षत्रं, तारकापुंज आदींनी व्यापलेलं आकाश पाहताना सर्वांनाच आनंद होतो. हौशी निरीक्षकांच्या मनात कुतुहल जागृत होतं, परंतु माहिती अभावी ते ’मावळून’ही जातं! मात्र या ताऱ्यांची, नक्षत्रांची व अखिल पसाऱ्याची सहजपणे खगोलीय माहिती मिळाली, तर अर्थातच निरीक्षणातील गम्य वाढतं. तसेच तारे ओळखून त्यांचे नेमके स्थान शोधून काढताना आपला आनंद व्दिगुणित होत राह्तो.

 

125.00 110.00

Description

नेमका हाच उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने या सुलभ मार्गदर्शन करणार्या व सचित्र स्वरुपत असलेल्या पुस्तकाची रचना केली आहे.
या पुस्तकाच्या साहाय्याने तार्यांचं, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनांचं तुम्हाला निरीक्षण करता येईल… मग तुमच्याकडे टेलिस्कोप असो वा नसो!
तारे-त्यांची ठिकाणं, त्यांचे बदलते रंग, आकर, त्यांचं उगवणं-मावळणं, नक्षत्र दिसण्याचा नेमका वेळ-काळ; तारकापुंज, अभ्रिका (नेब्यूला), आकाशगंगा, व्दैती तारे ते ’लाल महाराक्षसी तारे’… अशा बहुविध गोष्टींचा सुलभ-सचित्र खगोलीय परिचय करून देणारं हे पुस्तक हौशी निरीक्षकाचं एका जाणकार निरीक्षकात निश्चितच रूपांतर करू शकेल. अवघ्या अवकाशाची सहज सफर घडवणारा हौशी निरीक्षकाचा सखा-साथीदार ’वेध नक्षत्रांचा’!

Additional information

Weight 230 g
pages

80

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वेध नक्षत्रांचा | Vedh Nakshatrancha”