विशेष अकोलेकर | Vishesh Akolekar

भाषा : मराठी
लेखक : प्रो. मिलिंद कसबे (Prof. Milind Kasbe)
पृष्ठे : १२८
वजन : २०२ ग्रॅम

महाराष्ट्रातील अकोले तालुका हा आदिवासी लोकसमुहाने आणि निसर्गाने समृध्द असा तालुका आहे. कम्युनिष्ट चळवळीची परंपरा या तालुक्यात रुजली आहे. अगस्ती ऋषींच्या इतिहासकालीन पाऊलखूना अकोले येथे आहे. आज ही भूमी शेतीने समृध्द आहे. या तालुक्यातील इतिहास व वर्तमानातील अनेक प्रेरणा देणार्‍या व्यक्तिंचे जीवनकार्य संकलीत करुन स्थानिक इतिहासावर प्रकाश टाकणारे ‘विशेष अकोलेकर’ हे पुस्तक मिलिंद कसबे यांनी संपादित केले आहे. या पुस्तकाची निर्मिती आणि संकल्पना राजूर येथील प्रयोगशील शिक्षक ललित छल्लारे यांची आहे.

120.00

Description

क्रांतिवीर राघोजी भांगरे, स्वातंत्र्य-सेनानी बुवासाहेब नवले, राजकीय नेते दादासाहेब रुपवते, कॉम्रेट सक्रु बुधा मेंगाळ, पद्मश्री दया पवार, विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, संशोधक व मराठी साहित्याचे प्राध्यापक डॉ. तुकाराम रोंगटे, उद्योजक सुरेशराव कोते, शिल्पकार भालेराव, राष्ट्रीय दर्जाची खेळाडू श्रध्दा घुले या असामान्य व्यक्तींचे जीवनकार्य या पुस्तकात आहे.