२०२० साली प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाने मानवजातीच्या अनेक समजुतींना तडा दिला आहे.
‘माणूस मुळात स्वार्थीच असतो, स्वार्थ नसेल तर तो काहीच करत नाही ‘ या गृहीतकावर आजचं राजकारण आणि अर्थव्यवस्था उभारलेली आहे, तसंच ‘माणूस हा मुळात पापी प्रवृत्तीचा असतो,’ असंही धर्मशास्त्रे आपल्याला ओरडून ओरडून सांगत असतात.
परंतु या पुस्तकाचे लेखक रूट्गर ब्रेगमन यांचे म्हणणे असे की, विरुद्ध बाजूचा पुरावा कितीही स्पष्ट असला तरी आपण मूळचे क्रूर, अत्यंत लोभी, हिंसक आणि आक्रमक प्रजाती आहोत, असे मुळीच नाही. मात्र तरीही आपण तसे आहोत असे आपल्याला भासवण्यात आले आहे.
लेखक : रूट्गर ब्रेगमन
पाने : ३६२
साहित्य प्रकार : विज्ञान विषयक