सुधाकर लोंढे

भाषा : मराठी लेखक : सुधाकर लोंढे (Sudhakar Londhe) पृष्ठे : १९६ वजन : २१५ ग्रॅम “साद नर्मदेची” (नर्मदा परिक्रमा एक अलौकीक अनुभव) हजारो वर्षापासून असंख्य साधू-संत, महंत, गृहस्थी माणसं नर्मदा परिक्रमा करतात. सुधाकर लोंढे यांनी, गृहस्थी परिक्रमावासी म्हणून परिक्रमा केली. पण त्यांची परिक्रमा रंजक नसून वास्तववादी अशी आहे. त्यांच्या परिक्रमेत कुठेच अंधश्रद्धा, चमत्काराला थारा नाही. सत्याचा शोध घेताना त्यांनी मांडलेल्या अनुभवांना एक वेगळीच रंगत येते. 3200 किलो मीटरच्या पायी प्रवासात आलेले अनुभव आपल्याला सत्याच्या जवळ नेतात. नर्मदा परिक्रमेतील सत्याचा शोध घेताना त्यांची लेखनी व्यसन, बुवाबाजी, धार्मिकतेचा बाजार याला सुरुंग लावते आणि वाचकाला मानवतावादच्या जवळ नेते. हे पुस्तक नव परिक्रमावासीयांना मार्गदर्शन करणारे आणि एका अलौकीक जगाची सफरही घडवून आणते.
180.00
Read more
Browse Wishlist

Showing the single result