अ वूमेन्स करेज | A Womens Courage

भाषा : मराठी
अनुवाद :  प्रशांत तळणीकर ( Prashant Talanikar )
पृष्ठे : २२३
वजन :  ग्रॅम

220.00 198.00

Quantity

Description

मी भक्ष किंवा बळी ठरण्याचं नाकारते – जॅकलिन गोल्ड जॅकलिन गोल्ड ही `अ‍ॅन समर्स`, या एका प्रचंड यशस्वी किरकोळ विक्री दुकानांच्या साखळीची धडाडीची मुख्य कार्यकारी अधिकारी- चीफ एक्झिक्युटिव्ह, आहे. `कॉस्मोपॉलिटन` मासिक आणि `डेली मेल` वृत्तपत्रानं ब्रिटनमधली सर्वांत प्रभावशाली स्त्रियांपैकी एक म्हणून तिची निवड केली आहे, आणि ब्रिटनमधल्या सर्वांत यशस्वी महिलांमध्ये तिची गणना होते. पण तिला हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. `अ वुमन्स करेज`मध्ये पहिल्यांदाच तिनं आपली संपूर्ण आणि अद्भुत कहाणी लोकांसमोर मांडली आहे. सावत्र वडिलांनी लहानपणी केलेल्या छळाचं- तेव्हापासून तिच्या मानगुटीवर बसलेलं भूत तिनं कसं उतरवलं, खरं प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात तिच्या आयुष्यामध्ये घडलेली आणि तिचं हृदय भग्न करणारी अनेक वादळी प्रेमप्रकरणं आणि मूल होण्यासाठी, आपलं स्वत:चं कुटुंब निर्माण करण्यासाठी तिनं गर्भनलिका प्रजनन (आय.व्ही.एफ.) तंत्र वापरण्याचे जे अयशस्वी प्रयत्न केले, त्यातून पदरी आलेली निराशा आणि दु:ख, हे सगळं तिनं मोकळेपणानं सांगितलं आहे. बार्बरा टेलर ब्रॅडफर्डच्या `अ वुमन ऑफ सबस्टन्स`शी साम्य साधणाऱ्या आपल्या या कहाणीमध्ये जॅकलिन, एम्मा हार्ट या करारी, महत्त्वाकांक्षी आणि आवडण्याजोग्या काल्पनिक नायिकेचा आधुनिक अवतार वाटते. कहाणी वाचून समस्त स्त्री-वाचकांना ती आपल्यापैकीच एक असल्यासारखं वाटेल. ही एक ज्वलंत आणि प्रभावी कथा आहे. आपलं खरं मूल्य आणि क्षमता खूप उच्च आहेत, हे जाणून असणाऱ्या आणि ती पातळी गाठण्यासाठी प्रेरणा शोधत असलेल्या स्त्रियांसाठी हे पुस्तक म्हणजे एक मंगल स्तोत्र ठरेल.

Additional information

pages

223

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अ वूमेन्स करेज | A Womens Courage”