आर्मी जनरलच व्हायचंय ! | Aarmi General Ch Vhaychay !

भाषा : मराठी
लेखक : डॉ. श्रीराम गीत ( Dr. Shriram Git )
पृष्ठे : ११२
वजन : ग्रॅम

Original price was: ₹100.00.Current price is: ₹95.00.

Quantity

Description

आर्मी जनरल व्हायचंय! हे डॉ. श्रीराम गीत यांनी लिहीलेले पुस्तक सहज नजर फिरवावी म्हणून हाती घेतले. पण सुरूवात केल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवूच नये असे वाटले. मी एक पुस्तक वाचतो आहे का माझ्या जुन्या डायरीची पाने? हेच कळत नव्हते. अगदी आय्. एम्. ए. मधील सोनेरी दिवस पुन्हा:पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले. सैन्यदलात अधिकारी होण्याची इच्छा अनेक तरूणांमधे असते. पण आर्मी ऑफिसर होण्यासाठी किती खडतर प्रवास करावा लागतो याची यथायाग्य जाणीव हे पुस्तक वाचून होते. आर्मी ऑफिसर नेमके काय करतो? वरिष्ठपदाकडे वाटचाल कशी करतो? याबाबत सुटसुटीत, सखोल व सुयोग्य मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. मुलांना आणि त्याच्या पालकांना अतिशय उपयुक्त ठरेल असे हे पुस्तक आहे. वाय.डी. सहस्त्रबुद्धे रिटायर्ड लेफ्टनंट जनरल.