अशोक कुमार पांडेय यांची ४ पुस्तकं

१. त्याने गांधींना का मारलं : षडयंत्राची आणि स्त्रोतांची पडताळणी
हे पुस्तक गांधीहत्येला योग्य (?) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. तसेच गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत नाही, तर अखेरीस गांधीहत्येचं कारण असलेल्या वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरतं.
पाने : २९६ । किंमत : ३००/-

२. सावरकर : काळे पाणी आणि त्यानंतर..
या पुस्तकात सावरकरांच्या प्रचलित प्रतिमांचा विचार करून त्यांच्या क्रांतिकारकापासून राजनेत्यापर्यंतच्या आणि नंतर हिंदुत्वाच्या राजकारणाचा वैचारिक प्रतिनिधी आणि पुरोहित होण्यापर्यंतच्या विकासाचा खराखुरा क्रम समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सावरकरांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून स्वातंत्र्य आंदोलनाच्या एका मोठ्या पटाला समजून घेण्याचा, वाचण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
पाने : २४७ । किंमत : ३००/-

३. काश्मीर आणि काश्मिरी पंडित
काश्मीर हे एक कोडे आहे आणि काश्मिरी पंडित हे त्या कोड्याच्या आतील एक कोडे आहे. हे पुस्तक ह्या कोड्यातील काही गुंता इतिहासातील आणि वर्तमानातील काही स्रोतांच्या आधारे सोडवण्याच्या प्रयत्न करते. काश्मिर पंडितांच्या स्थापित आणि विस्थापित होण्याच्या १५०० वर्षांचा अभ्यास करते.
पाने : ४४० । किंमत : ४००/-

४. काश्मिरनामा : इतिहास आणि वर्तमान
काश्मीर नावाचा स्वर्ग आज नरक कसा बनला ह्याची कथा त्याच्या इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत हे पुस्तक विस्ताराने मांडते. पौराणिक संदर्भापासून आणि इतिहासापासून ते नवीन शोध आणि वादापर्यंत या पुस्तकाने काश्मीरवर प्रकाश टाकला आहे.
पाने : ५६५ । किंमत : ५००/-

1,500.00

Quantity